Lokrakshanay
Thursday, May 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home आरोग्य

थंडीत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 15, 2025
in आरोग्य
थंडीत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : हिवाळा येताच शरीराला अतिरिक्त काळजी घेण्याची गरज भासते. थंडीमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्गाचा धोका वाढतो. शिवाय पचनसंस्थेवरही परिणाम होतो आणि अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच हिवाळ्यात आहाराकडेही लक्ष देण्याची विशेष गरज असते. हिवाळ्यात शरीर उबदार आणि निरोगी ठेवण्यासाठी काही नैसर्गिक पेये पिणे खूप फायदेशीर आहे. ही पेये केवळ शरीर उबदार ठेवत नाहीत तर पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात. तसंच शरीर उबदार ठेवण्यासाठी हिवाळ्यात कोणती पेये प्यावे याबाबतही सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.


जिऱ्याचं पाणी – हिवाळ्यात जिऱ्याचं पाणी पिणं अत्यंत फायदेशीर असतं. जिऱ्यातील अंटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म पचन सुधारतात आणि पोटाच्या समस्या कमी करतात. जिऱ्याचं पाणी गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. ते तयार करण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचा जिरे उकळवा, गाळून घ्या आणि प्या. चव आणि याचे फायदे वाढवण्यासाठी त्यात थोडे मध देखील घालू शकता.

मेथीचे पाणी – मेथी ही गुणधर्मानुसार उष्ण असते, त्यामुळे हिवाळ्यात मेथीचे सेवन फायदेशीर ठरते. मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ते पचनास मदत करतात आणि उबदारपणा देतात. एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात उकळ, गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि ऊर्जा टिकून राहते.

आल्याचे पाणी – हिवाळ्यात आल्याचे पाणी हे खूप फायदेशीर पेय आहे. ते शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते, पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आल्यामधील घटक सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात. हे करण्यासाठी एक ग्लास पाण्यात आल्याचा एक छोटा तुकडा ठेचून किंवा किसून घाला, ते उकळवा आणि गाळून प्या. त्यामध्ये तुम्ही मध किंवा लिंबाचा रसही घालू शकता.

दालचिनीचे पाणी – दालचिनीचे पाणी केवळ शरीराला उबदार करत नाही, तर पचनसंस्था देखील मजबूत करते. त्यातील अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म अनेक आरोग्य समस्या टाळण्यास मदत करतात. हे पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दालचिनीचा एक छोटा तुकडा घाला. तो ५ ते ७ मिनिटे उकळवा, गाळून घ्या आणि प्या. डॉक्टरांच्या मते, दालचिनीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने चैतन्य टिकून राहण्यास मदत होते.

हळदीचे दूध – हिवाळ्यात हळदीचे दूध पिणे आवश्यक आहे. हळदीचे तापमान वाढवणारे गुणधर्म शरीराला थंडीपासून वाचवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. ते पचन सुधारण्यास देखील मदत करते. ते बनवण्यासाठी अर्धा चमचा हळद एक कप दुधात उकळवा आणि झोपण्यापूर्वी प्या. यामुळे शरीराला आराम मिळतो आणि निरोगी वाटते.

Previous Post

महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता पठण करावे – भाजपच्या माजी नगरसेविकेची मागणी

Next Post

क्रिकेटचा देव आणि फुटबॉलचा GOAT एका मंचावर

Next Post
क्रिकेटचा देव आणि फुटबॉलचा GOAT एका मंचावर

क्रिकेटचा देव आणि फुटबॉलचा GOAT एका मंचावर

BreakingNews

बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल सुरू; शेतकऱ्यांसाठी पारदर्शकतेकडे डिजिटल पाऊल

‘नटसम्राट’ नाटक केलं असतं तर कदाचित मेलो असतो – नाना पाटेकर

HSRP नंबर प्लेट नसल्यास १ जुलैपासून दंडात्मक कारवाई!

धोकादायक व रेबीजग्रस्त भटक्या कुत्र्यांवर कठोर कारवाईला मान्यता; सार्वजनिक ठिकाणांहून हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम

देशात चिकनपॉक्स रुग्णसंख्येत वाढ; डॉक्टरांकडून सतर्कतेचा इशारा

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाविरोधात ठाण्यात बैलगाडी मोर्चा; जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.