Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी नोंदणी करणे अनिवार्य – केंद्र शासनाचे शिक्षण विभागाला आदेश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 12, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी नोंदणी करणे अनिवार्य – केंद्र शासनाचे शिक्षण विभागाला आदेश
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी डिजिलॉकरमध्ये निकाल पत्रिका उपलब्ध व्हावी, यासाठी अपार आयडी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा अपार आयडी उपलब्ध करून त्याची नोंद राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर करावी, अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिले आहेत.

केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करावा असे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार सुमारे दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे कायमस्वरूपी डिजिटल रेकॉर्ड तयार होऊन सर्व शैक्षणिक गुणपत्रिका एकत्रित उपलब्ध होतात. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुलभ होते. शैक्षणिक संस्था त्वरित पात्रता पडताळणी करू शकतात. तसेच कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सादर करायची आवश्यकता नाही. सरकारी शिष्यवृत्ती व योजनांमध्ये लाभ मिळणे सुलभ होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी कुठूनही उपलब्ध होतात. केंद्रीकृत आणि सुरक्षित प्रणालीमुळे कागदपत्रे हरवण्याचा धोका राहत नाही. त्यामुळे सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा अपार आयडी उपलब्ध करून त्याची नोंद राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर करावी. त्याचप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे सादर करावा, असे म्हटले आहे.

Previous Post

राज्यातील रिक्षा, टॅक्सींना मिळणार पार्किंगची सुविधा – सरकारचा ग्रीन सिग्नल!

Next Post

विना परवाना श्वान पाळणाऱ्यांवर होणार आता दंडात्मक कारवाई – महापालिकेचा निर्णय

Next Post
विना परवाना श्वान पाळणाऱ्यांवर होणार आता दंडात्मक कारवाई – महापालिकेचा निर्णय

विना परवाना श्वान पाळणाऱ्यांवर होणार आता दंडात्मक कारवाई – महापालिकेचा निर्णय

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.