Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

निवडणुकीच्या रिंगणात ‘एआय’ची एन्ट्री! तरुण उमेदवारांचा प्रचारासाठी हायटेक फंडा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 30, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
निवडणुकीच्या रिंगणात ‘एआय’ची एन्ट्री! तरुण उमेदवारांचा प्रचारासाठी हायटेक फंडा
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी या बदलत असतात सध्या कृत्रीम बुद्धिमत्ताचे युग आले असून याचा पुरेपूर वापर सर्व क्षेत्रात होताना पाहायला मिळत आहे. यंदाच्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतही काही इच्छूक उमेदवारांकडून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणूका असो वा विधानसभा किंवा लोकसभा निवडणूका उमेदवारांकडून अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीचे निवडणूक प्रचार म्हणजेच ढोल ताशा वाजवणे, बॅनर – पोस्टर धरून दारोदारी मतांचा जोगवा मागत फिरणे. त्यासह मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे असाच प्रचार होताना आतापर्यंत पाहिले आहे. परंतू, गेले काही वर्षात समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम रील यामार्फत मोठी प्रसिद्धी मिळत आहे.

यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत देखील समाजमाध्यमांचा प्रचारासाठी वापर झालेला पाहायला मिळाले. परंतू, आता या जोडीला कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सर्वाच क्षेत्रात मोठ्याप्रमाणात केला जात आहे. विशेष करुन तरुण पिढी या तंत्रज्ञानाविषयी अधिक सजग झाली आहे. यंदा महापालिका निवडणूकीत अनेक नविन चेहरे निवडणूकीच्या रिंगणात उतरु पाहत आहेत. त्यांनी इच्छूक उमेदवार म्हणून तयारीला सुरुवात देखील केली आहे. या तरुणांकडून पारंपारिक प्रचार सोडून नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पूर्वी निवडणुकीचे पोस्टर बॅनर व्हिडिओ बनवण्याकरिता तासनतास वेळ वाया जात असे, ते नागरिकांपर्यंत पोहोचविणे याकरिता खर्चही मोठ्या प्रमाणात व्हायचा, मात्र एआय च्या मदतीने आता क्षणात पोस्टर तसेच आपल्याला हवे त्या प्रकारचे व्हिडिओ सुंदर अशा व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये क्षणात तयार झालेले पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे असलेल्या प्रभागात तो संपूर्णपणे नागरिकांपर्यंत पोहोचविता येतो.

Previous Post

स्वस्त जागेचा मोह नडला!

Next Post

२०२५चा शेवटचा सामना जिंकण्यासाठी भारताच्या लेकी उतरणार मैदानात!

Next Post
२०२५चा शेवटचा सामना जिंकण्यासाठी भारताच्या लेकी उतरणार मैदानात!

२०२५चा शेवटचा सामना जिंकण्यासाठी भारताच्या लेकी उतरणार मैदानात!

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.