रायगड : नवी मुंबईत एक घटना घडली. खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षिकीने तिच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या ५ वर्षाच्या चिमुरडीचे क्लासमध्येच केस धुतले. पालकांना जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी मुलीकडे विचारणा केली. चौकशीत खर कारण समजल्यावर पालकांना धक्का बसला.
नवी मुंबईतील उरण मधील जासई येथे ही घटना घडली आहे. घरगुती शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने पाच वर्षांच्या मुलीच्या डोक्यात पेनाचा धारदार टोक मारून तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. नीता म्हात्रे असे या शिक्षिकेचे नाव आहे. या शिक्षिकीने पाच वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यावर टोकदार पेनाने हल्ला केला. मुलाला गंभीर इजा झाली. पेनाचे टोक टोचल्यामुळे मुलीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. यामुळे भयभित झालेल्या शिक्षिकेने चिमुकलीचे केस देखील. शिकवणीची वेळ संपल्यावर मुलगी घरी गेली. मात्र ओले केस पाहून घरच्यांनी चिमुकलीला विचारपूस केली असता तिने शिक्षिकेने मारहाण केल्याचे सांगितले. यानंतर सदर दुर्दैवी घटना समोर आली. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.