मुंबई : मुंबईच्या धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. धारावीत आज सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं. तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार धारावीच्या परिसरात एक मशिद आहे. या मिशिदीचा काही भाग अवैध असल्याचं सांगितलं जातंय. धारावीतील हिमालया हॉटेल जवळची मेहबुबे सुभानिया मशिदवरील तोडक कारवाई करण्याची नोटीस मुंबई महानगरपालिकेने पाठवली होती. सदरची मशिद ही अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. त्यामुळे आज सकाळी मुंबई महानगरपालिकेचं पथक हा अवैध भाग तोडण्यासाठी धारावीत दाखल झाले होते. बीएमसीचं पथक आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडवले. तसेच बीएमसीच्या गाडीच्या काचाही फोडल्या. तसेच काही नागरिक रस्त्यावर बसले असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.