Lokrakshanay
Tuesday, May 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘सूर्या’ बिबट्याचा मृत्यू!

गंभीर विकारांवर उपचार सुरू असताना आठ वर्षीय नर बिबट्याची प्राणज्योत मालवली

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 19, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘सूर्या’ बिबट्याचा मृत्यू!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे ‘सूर्या’ नावाच्या आठ वर्षीय नर बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित गंभीर विकारांवर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने अखेर १७ मे रोजी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती उद्यान प्रशासनाने सोमवारी दिली. सूर्याला २०१८ मध्ये अहिल्यानगर वन विभागातून उद्यानात आणण्यात आले होते. त्यावेळी तो केवळ दोन महिन्यांचा बछडा होता. त्यानंतर मागील आठ वर्षांपासून त्याचे संगोपन, देखभाल आणि वैद्यकीय निगा उद्यानातच राखण्यात येत होती. १३ मे रोजी सूर्याच्या प्रकृतीत अचानक बदल जाणवल्यानंतर त्याच्यावर विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तपासणीत त्याला मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित गंभीर विकार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.

उद्यान प्रशासनाच्या माहितीनुसार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे वाचविण्यात आलेल्या अनेक बिबट्यांवर उपचार करून त्यांना विशेष देखरेखीखाली ठेवले जाते. काही वेळा मानवी वस्तीतून पकडण्यात आलेल्या बिबट्यांनाही येथे आणले जाते. उपचारानंतर वैद्यकीय अहवाल समाधानकारक असल्यास त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते, तर काही प्राण्यांची दीर्घकाळ देखभाल उद्यानातच केली जाते. राज्यातील इतर वन विभागांकडूनही अनेकदा लहान बछडे येथे आणले जातात आणि त्यांचे विशेष संगोपन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. तसेच उद्यानातर्फे वन्यप्राणी दत्तक योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत नागरिकांना ठराविक शुल्क भरून वर्षभरासाठी वन्यप्राणी दत्तक घेण्याची संधी दिली जाते. यापूर्वी राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बिबट्यांसह विविध वन्यप्राणी दत्तक घेतले आहेत.

Previous Post

तमिळनाडूच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री विजय यांच्याकडे गृह खाते

Next Post

‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; आता परीक्षा देवाची!

Next Post
‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; आता परीक्षा देवाची!

‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; आता परीक्षा देवाची!

BreakingNews

‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; आता परीक्षा देवाची!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘सूर्या’ बिबट्याचा मृत्यू!

तमिळनाडूच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री विजय यांच्याकडे गृह खाते

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.