Lokrakshanay
Tuesday, May 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईकरांना महागाईचा झटका! इंधन दरवाढीपाठोपाठ आता मुंबईकरांचा लाडका वडापावही महागला

कच्चा माल आणि निर्मिती खर्च परवडेनासा झाल्याने कंपन्यांकडून थेट दरवाढ लागू

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 19, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबईकरांना महागाईचा झटका! इंधन दरवाढीपाठोपाठ आता मुंबईकरांचा लाडका वडापावही महागला
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला असून, रोजच्या वापरातील पाव आणि ब्रेडच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आधीच दुधाचे वाढलेले दर, इंधन दरवाढ आणि वाढता घरगुती खर्च यामुळे नागरिक त्रस्त असताना आता ब्रेडच्या किंमती वाढल्याने घरगुती बजेट आणखी कोलमडण्याची शक्यता आहे. १६ मेपासून Modern Bread कंपनीने आपल्या काही प्रमुख ब्रेड प्रकारांच्या किंमती वाढवल्या आहेत. यानंतर इतर मोठ्या कंपन्याही दरवाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. आयात होणाऱ्या कच्च्या मालाचे वाढते दर, पॅकेजिंग खर्च, वाहतूक आणि इंधन दरवाढ यामुळे उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने आयात खर्चातही वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या उत्पादनावर होत असल्याचे सांगितले जात आहे.

नवीन दरांनुसार विविध प्रकारच्या ब्रेडच्या किंमतीत २ ते ५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सहा पावांच्या लादीमागे तब्बल ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ४०० ग्रॅम सँडविच ब्रेडची किंमत ४० रुपयांवरून ४५ रुपये झाली आहे. होल व्हीट ब्रेड आता ५५ रुपयांऐवजी ६० रुपयांना मिळत आहे, तर मल्टिग्रेन ब्रेडची किंमत ६० रुपयांवरून ६५ रुपये झाली आहे. स्मॉल ब्राऊन ब्रेड २८ रुपयांवरून ३० रुपये झाला असून व्हाईट ब्रेडची किंमत २० रुपयांवरून २२ रुपये करण्यात आली आहे. तसेच ब्राऊन ब्रेडचा दर ४५ रुपयांवरून थेट ५० रुपयांपर्यंत वाढला आहे. रोजच्या नाश्त्यापासून ते घरगुती आहारात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या खाद्यपदार्थांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आता महिन्याचा खर्च सांभाळताना अधिक कसरत करावी लागणार आहे.

Previous Post

‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; आता परीक्षा देवाची!

Next Post

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाविरोधात ठाण्यात बैलगाडी मोर्चा; जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन

BreakingNews

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाविरोधात ठाण्यात बैलगाडी मोर्चा; जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन

मुंबईकरांना महागाईचा झटका! इंधन दरवाढीपाठोपाठ आता मुंबईकरांचा लाडका वडापावही महागला

‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; आता परीक्षा देवाची!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘सूर्या’ बिबट्याचा मृत्यू!

तमिळनाडूच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री विजय यांच्याकडे गृह खाते

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.