Lokrakshanay
Tuesday, September 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

गरजूंसाठी पारदर्शकपणे काम करा; निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 6, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
गरजूंसाठी पारदर्शकपणे काम करा; निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : शासन आणि प्रशासन हे सर्वसामान्य जनतेचे लोकसेवक असून, गरजू नागरिकांसाठी मेहनत घेऊन पारदर्शकतेने काम करणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, भूसंपादन, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, माधवी नाईक, विक्रांत पाटील, कुमार आयलानी, जितेंद्र आव्हाड, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि मुद्रांक अधीक्षक उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील महसूल विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा सादर केला.

यावेळी मार्गदर्शन करताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाने शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी संवेदनशील आणि लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवावा, असे सांगितले. अधिकाऱ्यांनी नागरिकांचे रक्षक म्हणून कार्य करत मानवी मूल्ये जपत पारदर्शकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. अनावधानाने झालेल्या चुका क्षम्य असल्या तरी हेतुपुरस्सर, निष्काळजीपणे किंवा बेफिकीरपणे झालेल्या चुका कोणत्याही परिस्थितीत माफ केल्या जाणार नाहीत आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील रस्त्यांची मोजणी आणि सीमांकनाची प्रलंबित कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकाऱ्यांपैकी एक असल्याचे नमूद करून त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात भविष्यात अधिक लोकाभिमुख, नाविन्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण कामे होतील, असा विश्वास व्यक्त केला.

 

Previous Post

संकल्प संस्थेचे कार्य आता एका क्लिकवर; अधिकृत वेबसाईटचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

घरगुती गॅसवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार; सिलिंडर थेट १८ रुपयांनी महागणार!

Next Post
घरगुती गॅसवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार; सिलिंडर थेट १८ रुपयांनी महागणार!

घरगुती गॅसवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार; सिलिंडर थेट १८ रुपयांनी महागणार!

BreakingNews

आता रिक्षात बसण्यापूर्वीच कळणार भाडे; ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात!

राजा शिवछत्रपती मंडळाचा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात चाकूने हत्या; मुख्य सूत्रधारासह ७ आरोपींना अटक

उल्हास नदीला मिळाले ‘जीवनदान’; गणेशोत्सवात तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.