Lokrakshanay
Sunday, April 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

रेलनीर गायब! रेल्वे प्रवाशांना आता दुसऱ्या कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्यासाठी मोजावे लागणार जादा पैसे?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 11, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
रेलनीर गायब! रेल्वे प्रवाशांना आता दुसऱ्या कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्यासाठी मोजावे लागणार जादा पैसे?
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महानगरात तापमानात प्रचंड वाढ झाली असून, उन्हाच्या झळा नागरिकांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या बाटल्या खरेदी करण्यात वाढ झाली आहे. परंतु, मुंबईतील रेल्वे स्थानकात भारतीय रेल्वेचा ब्रॅड असलेल्या ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याच्या मागणी नुसार पुरवटा कमी झाल्याने, रेलनीर बाटल्या रेल्वे स्थानकातील स्टॉलवर दिसून येत नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेलनीर व्यतिरिक्त मान्यताप्राप्त खासगी बाटलीबंद पाणी विकण्यास परवानगी दिली आहे.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कसारा/कर्जत, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरारपर्यंत सर्व रेल्वे स्थानकात, हार्बर मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके, वापी आणि वलसाड स्थानकात ”रेलनीर”चा बाटलीबंद पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, सध्या वाढती मागणी आणि मर्यादित उत्पादन क्षमता असल्याने इतर बाटलीबंद पाणी विकले जात आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते सुरत विभाग आणि मध्य रेल्वेवरील ठाणे ते कर्जत विभागावर रेलनीरचा पुरवठा सध्या मर्यादित केला आहे. मध्य रेल्वेने ऑक्सिमोर एक्वा, रोकोको, एल्विश, इयोनिता, कन्हैय्या, ऑक्सिराइज, ऑक्सिग्रँड, ब्रिओटिन, व्हेनिस ब्लू, केल्विनो, विघ्नहर्ता आरोग्यम्, सनरिच एक्वा, ऑक्सीब्लू, इनव्होलाइफ यासारख्या इतर खासगी बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या स्टाॅलवर विकण्याची परवानगी दिली आहे. अंबरनाथ येथील कारखान्यातून दररोज एक लीटरच्या सुमारे १.७२ लाख पाण्याच्या बाटल्या तयार केल्या जातात. तसेच शताब्दी, वंदे भारत एक्स्प्रेससाठी ५०० मिलीच्या पाण्याच्या बाटल्या बनवल्या जातात. तर, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकात व उर्वरित इतर रेल्वेगाड्यांमध्ये एक लीटरची पाण्याची बाटल्यांचा पुरवठा केला जातोय.

Previous Post

सरकारी महिला कर्मचाऱ्यांना आता कामाच्या वेळेत सवलत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ‘लवकर या-लवकर जा’ योजनेची घोषणा

Next Post

दहावीचा गणिताचा पेपर फुटला? टेलिग्रामवर पेपर व्हायरल झाल्याने खळबळ; ग्रुप ॲडमिनसह सदस्यांवर गुन्हे दाखल

Next Post
दहावीचा गणिताचा पेपर फुटला? टेलिग्रामवर पेपर व्हायरल झाल्याने खळबळ; ग्रुप ॲडमिनसह सदस्यांवर गुन्हे दाखल

दहावीचा गणिताचा पेपर फुटला? टेलिग्रामवर पेपर व्हायरल झाल्याने खळबळ; ग्रुप ॲडमिनसह सदस्यांवर गुन्हे दाखल

BreakingNews

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.