Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

आईची हाक अन् सरकारची साथ! विशाखा सुभेदारांच्या पुत्राला सुरक्षित आणण्याचे एकनाथ शिंदेंचे आश्वासन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 4, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, मनोरंजन
आईची हाक अन् सरकारची साथ! विशाखा सुभेदारांच्या पुत्राला सुरक्षित आणण्याचे एकनाथ शिंदेंचे आश्वासन
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा लंडनला जायला निघाला असता युद्धजन्य परिस्थितीमुळे कुवेतच्या विमानतळावर अडकला आहे. याबद्दल व्हिडिओद्वारे विशाखा यांनी सरकारकडे मदतीची याचना केली होती. या व्हिडिओची तत्काळ दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल गेठे यांनी अभिनय याच्याशी संपर्क करून त्याची विचारपूस केली. त्यानंतर शिंदे यांनीही विशाखा सुभेदार यांच्याशी फोनवरून संवाद साधून आमचे अधिकारी अभिनयच्या संपर्कात असून तो सध्या आहे त्या हॉटेलमध्ये त्याची राहण्याची सोय केली असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र मंडळाचे डॉ. पैठणकर यांनीही त्यांच्या लोकांना फोन करून त्याच्याशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे. यासोबतच जशी विमानसेवा पूर्ववत होईल तसे त्याला पुन्हा मुंबईत सुखरूप आणण्यात येईल असेही शिंदे यांनी विशाखा यांना सांगून त्यांना याबाबत आश्वस्त केले.

अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला असून, अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आखाती देशांतील विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक भारतीय त्यात अडकले आहेत. हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढत आहे. त्यामुळे त्या भागात असलेल्या आपल्या कुटुंबीयांबद्दल अनेक जण काळजी व्यक्त करीत आहेत. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच काही कलाकार आणि त्यांचे कुटुंबीयही अडकले आहेत. ईशा गुप्ता, सोनल चौहान व नर्गिस फाखरी यांनी या संदर्भात माहिती दिली होती. अशातच आता मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनयसुद्धा कुवेतमध्ये अडकला आहे. लंडनला जात असताना त्याचं विमान कुवैतमध्ये उतरवलं गेलं असून, तिथल्या परिस्थितीमुळे विशाखा यांनी लेकाच्या काळजीपोटी मदत मागितली आहे. मुलाला भारतात सुखरूप आणलं जावं यासाठी विशाखा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे. मुलाच्या काळजीपोटी विशाखा यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यामुळे रडत रडत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे त्यांनी मदत मागितली आहे. याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाला भारतात परत आणण्याबाबत आश्वस्त केले आहे.

Previous Post

ठाणे ते नवी मुंबई ‘डबल डेकर’ मार्ग ठरतोय गेमचेंजर, ९० मिनिटांचा प्रवास केवळ ३० मिनिटांत

Next Post

आता ‘मेट्रो’ने गाठा विमानतळ! ट्रॅफिकच्या कटकटीतून पुणेकरांची कायमची सुटका

Next Post
आता ‘मेट्रो’ने गाठा विमानतळ! ट्रॅफिकच्या कटकटीतून पुणेकरांची कायमची सुटका

आता 'मेट्रो'ने गाठा विमानतळ! ट्रॅफिकच्या कटकटीतून पुणेकरांची कायमची सुटका

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.