Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ची नवीन डेट रिलीज

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 31, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन, मुंबई
‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ची नवीन डेट रिलीज
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट, आता पुन्हा एकदा तेवढ्याच जोशानं आणि तेवढीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता १३ फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं थोड्या प्रतीक्षेनंतर, लवकरच कुरळे बंधूंची धमाल आणि गोंधळ प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावांच्या चार जणांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळाची, गैरसमजांची आणि अनपेक्षित वळणांबद्दल कहाणी आहे. सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून मोठा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हा या कथेचा केंद्रबिंदू आहे. या सगळ्या गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे. ती या कुरळे बंधूंच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्यानं सगळ्यांची गडबड का उडाली, याची उत्तरं चित्रपट पाहूनच मिळेल. या सगळ्यात बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेमात पाडेल.

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अमेय विनोद खोपकर पिक्चर्सचे अमेय खोपकर म्हणतात, माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. हा आघात अत्यंत वेदनादायी असून, या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. अशा काळात कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करणे आम्हाला योग्य वाटला नाही. त्यामुळं संवेदनशीलतेची जाणीव ठेवत आम्ही ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच इतर चित्रपटांच्या प्रदर्शनावर कोणताही परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेत, आम्ही हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित करत आहोत. संवेदनशीलतेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांकडूनही समजून घेतल्या जाईल, असा विश्वास आहे.

Previous Post

मर्दानी ३ ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री! पहिल्याच दिवशी केली ४.५६ कोटींची कमाई

Next Post

येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण देशात ‘नवा प्राप्तिकर कायदा’ लागू होणार! केंद्र सरकारचा शिक्कामोर्तब

Next Post
येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण देशात ‘नवा प्राप्तिकर कायदा’ लागू होणार! केंद्र सरकारचा शिक्कामोर्तब

येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण देशात ‘नवा प्राप्तिकर कायदा’ लागू होणार! केंद्र सरकारचा शिक्कामोर्तब

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.