Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बुर्का काढा नाहीतर कॉलेज सोडा? विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजचा धार्मिक पोशाखावर निर्बंध

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 8, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
बुर्का काढा नाहीतर कॉलेज सोडा? विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजचा धार्मिक पोशाखावर निर्बंध
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोरेगाव येथील विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजने मुस्लिम विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोडवरून नवे निर्देश दिले आहेत. क्लासरूममध्ये बुर्का परिधान करण्यावर बंदी घातली आहे. धक्कादायक म्हणजे ड्रेस कोड मान्य नसेल तर अ‍ॅडमिशन रद्द करा, असा इशारा कॉलेज प्रशासनाने दिला आहे. विवेक कॉलेजच्या या निर्णयामुळे मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुंबईत गोरेगाव येथील विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजाने वर्गात बुर्का घालण्यास मनाई करणारा नवा नियम लागू केला आहे. धक्कादायक म्हणजे ड्रेस कोड मान्य नसेल तर अ‍ॅडमिशन रद्द करा, असा इशारा कॉलेज प्रशासनाने दिला आहे. यावरून मुस्लिम विद्यार्थिनींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. धार्मिक पोशाखावर निर्बंध आणल्याचा आरोप होत असल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

कॉलेजचा निर्णय त्यांच्या धर्मस्वातंत्र्यात हस्तक्षेप करणारा आहे, असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे, तर कॉलेज प्रशासनाने यामागे ‘सांस्कृतिक एकरूपता’ असल्याचे म्हटलं आहे. या प्रकरणी सध्या पोलिस आणि कॉलेज प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे. प्राचार्यांनी व्यवस्थापनाशी बोलून लवकरच मार्ग शोधण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या काही वर्षांत देशातील काही शैक्षणिक संस्थांकडून मुस्लिम विद्यार्थिनींच्या पोशाखावर निर्बंध आणल्याचे प्रकार समोर आले आहेत. कर्नाटकमध्ये सन २०२२ मध्ये हिजाब-बुर्का वादाने मोठे रूप घेतलं होते. महाराष्ट्रातही काही कॉलेजांनी यापूर्वी बुर्क्यावर बंदी घातली होती, मात्र हिजाब परवानगीयोग्य ठेवला होता. आता पुन्हा एकदा हा वाद उफाळला आहे. विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये अलीकडेच ड्रेस कोडमध्ये बदल करण्यात आला. नवीन नियमानुसार, वर्गात बुर्का व नकाब घालण्यास बंदी, हिजाब आणि हेडस्कार्फ परवानगी आहे. यापूर्वी अनेक विद्यार्थिनी बुर्का घालूनच वर्गात उपस्थित राहत असत. मात्र नव्या नियमामुळे त्यांना कॉलेज गेटवरच थांबवले जात असल्याचे समोर आले आहे.

Previous Post

यापुढे शालेय सहली एसटी बसमधूनच! खासगी बस वापरल्यास होणार कारवाई

Next Post

संत जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

Next Post
संत जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

संत जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.