Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

यापुढे शालेय सहली एसटी बसमधूनच! खासगी बस वापरल्यास होणार कारवाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 8, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
यापुढे शालेय सहली एसटी बसमधूनच! खासगी बस वापरल्यास होणार कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : शाळांच्या सहलीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शाळांच्या सहली आता एसटी बसमधूनच होणार आहेत. शाळांकडून सहलीसाठी खासगी बसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आत या खासगी बसच्या वापरावर निर्बंध लादण्यात आले आहेत. परिवहन विभागाने शाळांच्या सहलीबाबत काही महत्वाचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार आता स्कूल बस किंवा खासगी वाहनाने सहल काढल्यास कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्याच्या सहाय्यक परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे शाळांच्या सहली सरकारी बसने म्हणजेच लालपरी घेऊनच कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

महत्वाचे म्हणजे, शिक्षण विभागाच्या अटी आणि शर्तींचे पालन केले नाही तर कारवाई केली जाणार आहे. स्कूलबस किंवा खासगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा वस्तुस्थितीदर्शक स्वयंस्पष्ट अहवाल द्यावा, असे स्पष्ट आदेश राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त विजय तिराणकर यांनी दिले आहेत. त्यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे शाळांच्या सहली आता सरकारी बसने म्हणजे एसटी बसने घेऊन जाव्या लागणार आहेत. सरकारी निर्णयानुसार, शाळांनी सहलीसाठी सरकारच्या एसटी बसलाच प्राधान्य द्यावे हा नियम आहे. पण खासगी शाळांचा स्वत:च्या स्कूल बस सहलीसाठी वापरण्याचा आग्रह असतो. अनेक शाळा स्कूल बस व्यतिरिक्त खासगी बसचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण परिवहन विभागाच्या नव्या आदेशानुसार आता स्कूलबस किंवा खासगी बसने सहल काढल्यास कारवाई केली जाईल. त्यामुळे शाळांना यापुढे विद्यार्थ्यांची सहल न्यायची असेल तर त्यासाठी लालपरीचा वापर करावा लागेल.

Previous Post

मनोरंजन विश्वावर शोककळा! ज्येष्ठ अभिनेता काळाच्या पडद्याआड

Next Post

बुर्का काढा नाहीतर कॉलेज सोडा? विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजचा धार्मिक पोशाखावर निर्बंध

Next Post
बुर्का काढा नाहीतर कॉलेज सोडा? विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजचा धार्मिक पोशाखावर निर्बंध

बुर्का काढा नाहीतर कॉलेज सोडा? विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजचा धार्मिक पोशाखावर निर्बंध

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.