Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

विना नोंदणी कार्य करणाऱ्या दिव्यांग संस्थांवर कारवाई होणार, ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आदेश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 12, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
विना नोंदणी कार्य करणाऱ्या दिव्यांग संस्थांवर कारवाई होणार, ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आदेश
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे जिल्ह्यासह मुंबई विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक दिव्यांग संस्था शासनाकडे नोंदणी केल्याशिवाय कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण विभागाने अशा संस्थांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कारवाई टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संस्थांना ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले असून, संस्थांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या प्रमुख उज्वला सपकाळे यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार कलम ५१ आणि ५२ अंतर्गत, दिव्यांग क्षेत्रात कार्य करावयाच्या सर्व संस्थांनी शासनाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. राज्य शासनाने दिव्यांग कल्याण आयुक्त यांना या अधिनियमांतर्गत सक्षम अधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या मार्फतच संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र प्रदान केले जाते. या नोंदणीशिवाय कार्यरत राहणे हे कायद्याचे उल्लंघन ठरत असल्याने कलम ९१ नुसार अशा संस्थांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. ठाणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे यांनी सांगितले की, “ठाणे जिल्ह्यात दिव्यांगांच्या पुनर्वसन, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी आपली नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे. विना नोंदणी कार्यरत राहणे हा गंभीर गैरप्रकार आहे. त्यामुळे संबंधित संस्थांनी ३० नोव्हेंबर पूर्वीच आपले प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात सादर करावेत, अन्यथा कारवाई टाळता येणार नाही.”

Previous Post

मुंबईत २२ तास पाणीपुरवठा राहणार पूर्णपणे बंद!

Next Post

राहत्या घरात अचानक बेशुद्ध झाला गोविंदा! उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Next Post
राहत्या घरात अचानक बेशुद्ध झाला गोविंदा! उपचारासाठी रुग्णालयात दाखल

राहत्या घरात अचानक बेशुद्ध झाला गोविंदा! उपचारासाठी रुग्णालयात दाखल

BreakingNews

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.