Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

कल्याण रेल्वे स्थानकात चोरीच्या वाढत्या घटना; चार तासात २ फोन चोरी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 26, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
कल्याण रेल्वे स्थानकात चोरीच्या वाढत्या घटना; चार तासात २ फोन चोरी
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी चार तासाच्या कालावधीत दोन प्रवाशांचे महागडे मोबाईल फोन चोरट्यांनी गर्दीच्या वेळेत खिशातून काढून लांबवले आहेत. या चोरीप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या जवळील किमती ऐवज, मोबाईल चोरीच्या होणाऱ्या वाढत्या घटनांचा विचार करून कल्याण रेल्वे स्थानकात सातही फलाटांवर रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, लोहमार्ग पोलीस, कमांडो तैनात असतात. अनेक वेळा प्रवाशांचा ऐवज चोरणारे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून रेल्वे पोलीस झटपट पकडतात. चोरटे पकडले गेल्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकातील चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल, असे वाटत असतानाच पुन्हा नवीन चोर याठिकाणी सक्रिय होतात.

मंगळवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीजवळ एक प्रवासी आपला मोबाईल खिशात ठेऊन झोपला होता. या प्रवाशाची गाडी सकाळच्या वेळेत होती. त्यामुळे रात्री दीड ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान या प्रवाशाच्या खिशातील मोबाईल चोरट्याने मोठ्या कौशल्याने काढून घेतला आणि पळ काढला. संबंधित प्रवासी सकाळी आपल्या लांब पल्ल्याच्या गाडीची वेळ झाली म्हणून उठला. त्याने खिशात पाहिले तर मोबाईल फोन नव्हता. त्याने आजुबाजुला पाहिले पण कोठेही मोबाईल आढळला नाही. त्यामुळे चोरट्याने मोबाईल चोरल्याची खात्री पटल्यावर या प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Previous Post

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव मिळण्यासाठी ठाणेकरांची ‘दि.बा. जागर यात्रा’

Next Post

मुंबई – ठाणे मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी सरकारचा भर, ४६२ कोटींचा निधी मंजूर

Next Post
मुंबई – ठाणे मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी सरकारचा भर, ४६२ कोटींचा निधी मंजूर

मुंबई - ठाणे मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी सरकारचा भर, ४६२ कोटींचा निधी मंजूर

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.