Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव मिळण्यासाठी ठाणेकरांची ‘दि.बा. जागर यात्रा’

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 25, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव मिळण्यासाठी ठाणेकरांची ‘दि.बा. जागर यात्रा’
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव का लागले पाहिजे याविषयी ठाणे शहरातील विविध गावठाण, कोळीवाडे येथील प्रत्येक ठाणेकर भूमिपुत्रांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी कोळी समाजाने नवरात्रौत्सवात ठाणे शहरात दिबा जागर यात्रा सुरु केली आहे. नवरात्रौत्सव मंडळात ही दिबा जागर यात्रा राबविली जात आहे. दिबा जागर यात्रेचा उद्देश, दिबा पाटील यांच्या सामाजिक राजकीय कार्याची महती सांगितली जाते. नुकतीच ही दिबा जागर यात्रा चेंदणी कोळीवाडा, वाघबीळ येथे पार पडली. कोपरी, बाळकुम, कासारवडवली, कोळीवाडा, मोघरपाडा, ओवळा, भाईंदरपाडा, कळवा, ढोकाळी याठिकाणी दिबा जागर यात्रा आयोजित केली जाणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या विशेष चर्चेत आहे. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आगरी-कोळी भूमीपुत्र समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मध्यंतरी शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी एक बाईक रॅली काढत या समाजातील भावनांना वाट करुन दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव मिळण्यासाठी मागचे पाच ते सहा वर्षे आंदोलन सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी या विमानतळाच्या उद्घाटन ३० सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल असे जाहीर करण्यात आले होते. परंतू, त्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी ३० सप्टेंबरला विमानतळाचे उद्घाटन होणार नाही अशी माहिती माध्यमांना दिली. परंतू, अद्याप विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिले जाईल याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही.

Previous Post

भारतात लवकरच सुरू होणार ‘हवाई टॅक्सी’, १ तासाचा प्रवास १० मिनिटांत

Next Post

कल्याण रेल्वे स्थानकात चोरीच्या वाढत्या घटना; चार तासात २ फोन चोरी

Next Post
कल्याण रेल्वे स्थानकात चोरीच्या वाढत्या घटना; चार तासात २ फोन चोरी

कल्याण रेल्वे स्थानकात चोरीच्या वाढत्या घटना; चार तासात २ फोन चोरी

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.