Lokrakshanay
Tuesday, September 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पैसे दुप्पटच्या आमिषाने बदलापूरात साडेसात लाखांची फसवणूक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 15, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
पैसे दुप्पटच्या आमिषाने बदलापूरात साडेसात लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : बदलापूर शहरात पुन्हा एकदा गुंतवलेले पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल साडेसात लाख रुपये सहा महिन्यांत दुप्पट परत मिळतील, असे आश्वासन देऊन एका महिलेने आणि तिच्या मुलाने फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे दुप्पट करण्याचा मोह अनेकांना मोठ्या आर्थिक संकटात टाकत असतो. अनेकदा अशा अमिषाला बळी पडून अनेकांची मोठी फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येतात. ऑनलाईन माध्यमातून अमिष दाखवून सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे प्रकार केले जातात. त्यांचा उलगडा अनेकदा होत नाही. आर्थिक फसवणुकीत पैसे खात्यातून वळते झाल्यानंतर त्याचा परतीचा काळ असेपर्यंत त्याची नीटशी तक्रार होत नाही. त्यामुळे अशा फसवणुकीत कमी वेळा पैसे परत मिळतात. त्यामुळे नागरिक ओळखीच्या व्यक्तींकडे गुंतवणुकीसाठी प्राधान्य देतात. मात्र ओळखीच्या व्यक्तींकडूनही फसवणुक झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार बदलापुरात समोर आला आहे.

प्रार्थना स्थळावर ओळख असल्याने त्यांच्या सांगण्यावरून उल्हासनगरातील एका ५६ वर्षीय व्यक्तीने बदलापुरातील माय लेकांकडे पैसे गुंतवले. मात्र त्याचा परतावा न मिळाल्याने त्यांची फसवणुक झाली. यातील फिर्यादी बेनेडीक्ट जोसेफ ओळखीच्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार आरोपींकडे गुंतवणुकीसाठी गेले. त्यांनी फिर्यादींना विश्वासात घेतले. फक्त सहा महिन्यांत गुंतवणुकीवर दुप्पट पैसे मिळतील, असे सांगत त्यांनी पैसे जमा करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी यांनी ५ एप्रिल २०२४ रोजी ५ लाख रुपये नवजीवन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आपल्या खात्यातून ऍक्सिस बँक, बदलापूर येथील आरोपी महिलेच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पाठवले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ एप्रिल रोजी आणखी अडीच लाख रुपये त्याच खात्यावर जमा केले. एकूण साडे सात लाख रुपये जमा करून ते पैसे दुप्पट होण्याची वाट पाहत होते. १ ऑक्टोबर २०२४ रोजी पैसे परत करण्याची मुदत संपल्यानंतर फिर्यादी यांनी पैशांबद्दल विचारणा केली असता आरोपी रुद्र बागडे याने फोनवर पैशांबाबत मला काही माहिती नाही आणि पैसेही परत देऊ शकत नाही, असे स्पष्ट सांगून टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे विश्वासघात झाल्याचे लक्षात येत फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, रोहिणी बागडे व रुद्र बागडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Previous Post

जीटीबी ते वडाळादरम्यान मोनोरेल गाडी अचानक बंद, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे ५८८ प्रवासी सुखरुप

Next Post

रुग्णालयात नोकरीची संधी देण्याच्या आमिषाने डॉक्टर दाम्पत्याकडून डॉक्टरांची ७० लाखांची फसवणूक

Next Post
रुग्णालयात नोकरीची संधी देण्याच्या आमिषाने डॉक्टर दाम्पत्याकडून डॉक्टरांची ७० लाखांची फसवणूक

रुग्णालयात नोकरीची संधी देण्याच्या आमिषाने डॉक्टर दाम्पत्याकडून डॉक्टरांची ७० लाखांची फसवणूक

BreakingNews

आता रिक्षात बसण्यापूर्वीच कळणार भाडे; ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात!

राजा शिवछत्रपती मंडळाचा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात चाकूने हत्या; मुख्य सूत्रधारासह ७ आरोपींना अटक

उल्हास नदीला मिळाले ‘जीवनदान’; गणेशोत्सवात तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.