Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

”राजकीय अजेंड्यांनुसार न्यायालय चालेल अशी अपेक्षा करणं चुकीचे..”- माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड

संजय राऊत यांच्या 'त्या' विधानावर माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी दिले उत्तर..

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 27, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश, नवी दिल्ली, महाराष्ट्र, मुंबई
”राजकीय अजेंड्यांनुसार न्यायालय चालेल अशी अपेक्षा करणं चुकीचे..”- माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. चंद्रचूड यांनी आमदारांना अपात्र ठरविण्याच्या प्रकरणांवर योग्य व वेळेत निर्णय घेतला नाही, ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं, असा आरोप राऊत यांनी केला होता.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माजी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आमच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाची घटनात्मक प्रकरणं सुरू होती. नऊ न्यायमूर्तींचे खंडपीठ, सात न्यायमूर्तींचे खंडपीठ आणि पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाचे निर्णय आम्ही दिले. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्याची सुनावणी करावी, हे कोणताही एक पक्ष किंवा व्यक्ती ठरवू शकतो का? सॉरी हा निर्णय फक्त सरन्यायाधीशच घेऊ शकतात.

आरोप फेटाळत चंद्रचूड म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाकडे मर्यादित साधने आणि न्यायाधीश देखील मर्यादित आहेत आणि म्हणूनच घटनात्मक प्रकरणे हाताळताना समतोल राखणं आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयात गेल्या २० वर्षांपासून अनेक महत्त्वाची प्रकरणे प्रतीक्षेत आहेत. ती जुनी प्रकरणे ऐकण्यापेक्षा अलीकडच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करावे का? सर्वोच्च न्यायालयाचे प्राधान्य समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या घटनात्मक मुद्द्यांवर आहे.

संजय राऊत यांच्या आरोपावर बोलताना डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, काही राजकारण्यांना वाटतं की आम्ही त्यांचा अजेंडा पाळला तरच आम्ही स्वतंत्र आहोत. राजकीय अजेंड्यांनुसार न्यायालय चालेल अशी अपेक्षा करणं चुकीचे आहे.

Previous Post

पुणे पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Next Post

माहिती नाकारल्याने राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने विरारच्या निवृत्त तलाठ्याला सुनावला २५ हजारांचा दंड

Next Post
माहिती नाकारल्याने राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने विरारच्या निवृत्त तलाठ्याला सुनावला २५ हजारांचा दंड

माहिती नाकारल्याने राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने विरारच्या निवृत्त तलाठ्याला सुनावला २५ हजारांचा दंड

BreakingNews

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.