Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

लियोने पोलीसांसोबत मिळून अनेक गुन्ह्यांचा लावला छडा, त्याला निरोप देतांना पोलिस अधिकाऱ्यांना देखील अश्रु अनावर झाले होते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 27, 2024
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
पुणे पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे :  पुणे पोलीसांचा लाडका लियोचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. लियोने पोलीसांसोबत मिळून अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. त्याने कोट्यवधी अंमली पदार्थाअसोबतच शस्त्रसाठा व चोरांचा माग काढला आहे. या लाडक्या लिओच्या पार्थिवावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याला निरोप देतांना पोलिस अधिकाऱ्यांना देखील अश्रु अनावर झाले होते.

श्वान लिओ हा लॅब्राडोर जातीचा श्वान होता. त्याचा जन्म २० जुलै २०१६ रोजी झाला होता. लिओने २० सप्टेंबर २०१६ रोजी पुणे पोलीस दलात दाखल होत त्याच्या सेवेला सुरुवात केली होती. लिओचा अंमली पदार्थ शोधण्यात हातखंड होता. त्याला यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आले होते. ‘लिओ’ने २८ डिसेंबर २०१९ रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये पोलिसांसोबत महत्वाची कामगिरी करत एका नायजेरीयन व्यक्तीकडून व ५० किलो गांजा पकडून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतामधून ७० किलो गांजा पकडून दिला होता. या सोबतच २०१९ मध्ये कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नायजेरियन नागरिकाकडून अंमली पदार्थ आणि ५० किलो गांजा जप्त करण्यात लिओने महत्त्वाची भूमिका होती. या सोबतच पुणे रेल्वे स्थानक, बसस्थानक, येरवडा कारागृहात नियमितपणे अंमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी ‘लिओ’कार्यरत होता. लिओच्या घ्राणेंद्रिय इतर श्वानांपेक्षा तीक्ष्ण असल्याने त्याचा फायदा पोलिसांना मोठा फायदा झाला. लिओने भारतीय लष्कराच्या जवानांकरिता डेमो प्रात्यक्षिके तसेच विविध शाळांमध्ये प्रात्यक्षिके देखील सादर केले.

लिओ हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याला अन्ननलिकेचा आजार होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतांना त्याची प्राणज्योत मालवली. लिओवर महापालिकेच्या पशू दाहिनीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या शरीरावर तिरंगा झेंडा गुंडाळण्यात आला होता. तर, पोलिसांनी त्याला अंत्यसंस्कारापूर्वी बंदुकीच्या २१ फैरीझाडून मानवंदना देखील दिली. यावेळी अनेकांना अश्रु अनावर झाले होते. यावेवली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त, एमओबीचे पोलीस निरीक्षक, श्वान पथकाचे अधिकारी व कर्मचारी, सलामी गार्ड उपस्थित होते.

Previous Post

राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात होणार फेर मतमोजणी

Next Post

”राजकीय अजेंड्यांनुसार न्यायालय चालेल अशी अपेक्षा करणं चुकीचे..”- माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड

Next Post
”राजकीय अजेंड्यांनुसार न्यायालय चालेल अशी अपेक्षा करणं चुकीचे..”- माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड

''राजकीय अजेंड्यांनुसार न्यायालय चालेल अशी अपेक्षा करणं चुकीचे..''- माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.