Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आई-वडील घरकामात व्यस्त अन् अंगणात रांगणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप..; मुलाचा मृत्यू

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 19, 2024
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
आई-वडील घरकामात व्यस्त अन् अंगणात रांगणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप..; मुलाचा मृत्यू
Share on FacebookShare on Whatsapp

शिरुर : शिरुर तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणात खेळत असणाऱ्या एका ४ वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घातली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

ही दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात काल शुक्रवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास घडली आहे. वंश राजकुमार सिंग, असं मृत मुलाचे नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ वर्षीय चिमुकला वंश हा रात्री अंगणात खेळत होता. त्याचे आई-वडील घरकामात व्यस्त होते. यावेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. आरडाओरड होताच चिमुकल्याच्या मानगुटीला पकडून बिबट्याने जवळच्या ऊसाच्या शेतात पळून गेला. नागरिकांनी त्याचा पाठलाग केला असता, बिबट्याने चिमुकल्याला सोडून दिले. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या वंशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून वनविभागाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या अनेक दिवसापासुन पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याची मोठी दहशत असल्याचे दिसून येत आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. पाळीव प्राण्यांसह माणसांवरील दिवसाढवळ्या बिबट्या हल्ले करीत आहे. तसेच रात्रीच्या वेळी बिबट्यांची टोळकी शिकारीसाठी थेट लोकवस्तीत सुद्धा येऊ लागली आहेत.

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे. अनेकजण बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी वनविभाग अपयशी ठरत असल्याने नागरिकांसह पाळीव प्राण्यांचे देखील जीव जात आहेत. या घटनेवरुन नागरिकांनी वनविभागाविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

Previous Post

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास पो.उ.नि. नितीन जाधव यांनी टाळाटाळ केल्याने निलंबन

Next Post

भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Next Post
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.