Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास पो.उ.नि. नितीन जाधव यांनी टाळाटाळ केल्याने निलंबन

ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी गुन्हा दाखल करण्यास कसूरी केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 19, 2024
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास पो.उ.नि. नितीन जाधव यांनी टाळाटाळ केल्याने निलंबन
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाण्यात १९ वर्षीय मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरूणी सात महिने गरोदर होती. तिची प्रसूती कळवा पूलाखाली झाल्यानंतर ती ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली होती. याप्रकरणात ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव यांनी गुन्हा दाखल करण्यास कसूरी केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पिडीत तरूणी ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास आहे. तिच्यावर एका तरूणाने लैंगिक अत्याचार केले होते. त्यापासून ती सात महिन्यांची गर्भवती होती. बुधवारी रात्री तिला प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तिच्याकडून पूर्वीचे वैद्यकीय कागदपत्र आणि जन्मदाखल्याची मागणी करण्यात आली. परंतु कागदपत्र नसल्याने ती रुग्णालयातून बाहेर पडली. गुरुवारी ती कळवा पूलाजवळ आली असता, तिची प्रसूती झाली. यात तिचे बाळ दगावले. त्यानंतर पिडीत मुलगी तिच्या पालकांसोबत अत्याचार प्रकरणाची तक्रार नोंदविण्यासाठी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गेली.

येथील पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव यांनी तक्रार नोंदविली नाही. याबाबत स्थानिकांनी समाजमाध्यमांवर वृत्त प्रसारित केल्यानंतर परिमंडळ एकचे उपायुक्त सुभाष बुरसे यांनी नितीन जाधव यांच्या निलंबनाचे आदेश काढले. दरम्यान, कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण कापूरबावडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणात डाॅक्टरांचीही हलगर्जी असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डाॅक्टरांना विचारले असता, ती अल्पवयीन असल्याचा संशय आल्यामुळे तिच्याकडे जन्मदाखला तसेच कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी कागदपत्र त्यांनी दिले नाही म्हणून त्यांना याप्रकरणी पोलीसात नोंद करण्याची सूचना केल्याचे स्पष्टीकरण दिले.

Previous Post

पोलीस पथकावर प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपीला २६ वर्षांनंतर अटक

Next Post

आई-वडील घरकामात व्यस्त अन् अंगणात रांगणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप..; मुलाचा मृत्यू

Next Post
आई-वडील घरकामात व्यस्त अन् अंगणात रांगणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप..; मुलाचा मृत्यू

आई-वडील घरकामात व्यस्त अन् अंगणात रांगणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप..; मुलाचा मृत्यू

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.