Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पोलीस पथकावर प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपीला २६ वर्षांनंतर अटक

शंकर काळे ऊर्फ नाना असे या ५५ वर्षीय आरोपीचे नाव असून सहा महिने कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 19, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
पोलीस पथकावर प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपीला २६ वर्षांनंतर अटक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मालाड परिसरात दरोड्यादरम्यान पोलीस पथकावर दगडफेक करून प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपीला २६ वर्षांनंतर अटक करण्यात अखेर दिंडोशी पोलिसांना यश आले. शंकर बाजीराव काळे ऊर्फ नाना असे या ५५ वर्षीय आरोपीचे नाव असून सहा महिने कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. अखेर २६ वर्षांनी त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मालाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एलोरा सहकारी सोसायटीमध्ये ५ ऑक्टोंबर १९९६ रोजी चड्डी बनियान टोळीने सशस्त्र दरोडा टाकला होता. पळून जाताना या आरोपींना गस्त घालणार्‍या पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी या आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली होती, घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात काही पोलिसांसह साक्षीदार गंभीररीत्या जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ आरोपींच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारात चड्डी बनियान टोळीचा म्होरक्या चकमकीत मारला गेला. त्याचे चार सहकारी चोरीच्या मुद्देमालासह अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानंतर पथकाने पळून गेलेल्या तिघांना संभाजीनगर परिसरातून अटक केली होती. त्यात शंकर काळे याचाही समावेश होता. सहा महिने कारागृहात राहिल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता.

जामिनावर बाहेर येताच शंकर काळे पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीस सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोध मोहीम सुरू असताना शंकर सांताक्रुज येथील के. के गांगुली मार्गावरील एकता चाळीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी तेथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. याचदरम्यान शंकर किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

सुरुवातीला त्याने आपण शंकर काळे नसल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशी केल्यानंतर तो या गुन्ह्यांतील आरोपी शंकर असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील न्यायालयात हजर करण्यात आले. गेल्या २६ वर्षांपासून शंकरचा शोध सुरू होता. अखेर त्याला पकडण्यात यश आले.

Previous Post

आता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांच्या खटल्यांचे होणार थेट प्रक्षेपण

Next Post

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास पो.उ.नि. नितीन जाधव यांनी टाळाटाळ केल्याने निलंबन

Next Post
लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास पो.उ.नि. नितीन जाधव यांनी टाळाटाळ केल्याने निलंबन

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास पो.उ.नि. नितीन जाधव यांनी टाळाटाळ केल्याने निलंबन

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.