Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांच्या खटल्यांचे होणार थेट प्रक्षेपण

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून खटल्यांच्या वाटपात प्रगती आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 19, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश, नवी दिल्ली
आता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांच्या खटल्यांचे होणार थेट प्रक्षेपण
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे पाऊल उचलत सर्व प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांचे थेट प्रक्षेपण करता येईल, असे अॅप चाचणीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी आतापर्यंत केवळ घटनापीठा समोरील खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जात होते, परंतु सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने याचा विस्तार सर्व खंडपीठांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दैनंदिन सुनावणीचे नियमित थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे.

कोविड महामारीनंतर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच घटनापीठासमोरील खटल्यांचे यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली होती, जी अजूनही सुरू आहे आणि आता ती सर्व न्यायालयांमध्ये लागू केली जात आहे. २७ सप्टेंबर २०२२ रोजी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या तीन घटनापीठांच्या सुनावणीचे प्रथम थेट प्रक्षेपण करण्यात आले होते, तेव्हा ८ लाखांहून अधिक लोकांनी ते कामकाज पाहिले होते.

तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, हे पाऊल दूरवरच्या लोकांना न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी अडथळे दूर करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहण्याची संधी मिळेल.

खरे तर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हे त्यांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामासाठी ओळखले जातात. त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून खटल्यांच्या वाटपात प्रगती आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहेच, शिवाय जलद सुनावणीच्या व्यवस्थेतही मोठा बदल घडवून आणला आहे. पुढील महिन्यात १० नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी आपली शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली आहे.

Previous Post

बाबा सिद्दीकी यांचा सुरक्षारक्षक कॉन्स्टेबल श्याम सोनावणे याच्यावर निलंबनाची कारवाई

Next Post

पोलीस पथकावर प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपीला २६ वर्षांनंतर अटक

Next Post
पोलीस पथकावर प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपीला २६ वर्षांनंतर अटक

पोलीस पथकावर प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपीला २६ वर्षांनंतर अटक

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.