Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे नेते जाणार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

ठाकरे गटातील कोणता नेता भेटीला जाणार ठरणार महत्त्वाचं

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 22, 2023
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
महाविकास आघाडीचे नेते जाणार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात महत्त्वाच्या हालचाली घडत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी रणनीती आखत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. दुसरीकडे भाजपच्याही गोटात प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षही कामाला लागला आहे. असं असताना आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थात महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. हे शिष्टमंडळ मुंबईतील आगामी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ या आठवड्याच्या शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या शिष्टमंडळात महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेमके कोण नेते असणार, विशेषत: ठाकरे गटातील कोणते नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाविकास आघाडीचं शिष्ठमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यामागील कारण म्हणजे इंडिया आघाडीची येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होऊ घातलेली बैठक. इंडिया आघाडीच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. यातली पहिली बैठक ही पाटण्यात पार पडली होती. तर दुसरी बैठक बंगळुरुत पार पडली होती. त्यानंतर आता तिसरी बैठक ही मुंबईत नियोजित आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु आहे.   इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वारंवार बैठका पार पडत आहेत. या बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जय्यत तयारी सुरु आहे. या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच बैठकीसाठी मुंबईतील नियोजनाबाबत आणि पोलीस सुरक्षेबाबत मविआचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

Previous Post

भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याहस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

Next Post

गवार ही भाजी आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Next Post
गवार ही भाजी आरोग्यासाठी आहे फायदेशीर

गवार ही भाजी आरोग्यासाठी आहे फायदेशीर

BreakingNews

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.