Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नागरिकांच्या सहभागातून पुणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार : मा.अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 3, 2024
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
नागरिकांच्या सहभागातून पुणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार : मा.अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बेसिक पोलिसिंगबरोबरच गुन्ह्याचा शोध, वाहतूक मॅनेजमेंट, महिला आणि मुलांची सुरक्षा, सायबर गुन्ह्यांबाबत जागृती आणि अटकाव, आर्थिक गुन्हे, अंमली पदार्थांना पायबंद आणि व्हीआयपी मूव्हमेंट हा सात कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्धार नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (दि.०१) व्यक्त केला. अतिरिक्त पोलिस महासंचालक अमितेश कुमार यांची बुधवारी (दि. ३१) पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांनी गुरुवारी सायंकाळी रितेश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमितेश कुमार म्हणाले की, ‘नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण, तसेच त्यांच्याबरोबर सकारात्मक संवाद ठेवण्याची आमची प्राथमिकता राहील. गुन्हे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांची सुरक्षा, शहरात जे अंमली पदार्थाचे हॉटस्पॉट आहेत, त्याच्याकडे आमचे लक्ष राहील. व्हिजिबल पोलिसिंग कसे वाढविता येईल याच्यावर माझा भर असेल. अतिरेकी कारवाया होऊ नये यासाठी आमचे प्राधान्य असेल. सामान्य जनतेला सोबत घेऊन आमचा काम करण्याचा मानस राहील असेही त्यांनी सांगितले.
– क्राईम नियंत्रणाच्या दृष्टीने दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याचा वापर करणाऱ्यांवर परिणामकारक कारवाई केली जाईल.
– शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील टॉप २० गुन्हेगारांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाईल.
– कॅमेरा आधारित वाहतूक नियंत्रणावरही आमचा भर असेल, असेही ते म्हणाले.
– ट्रिपल सीट आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल. हेल्मेट वापरण्याच्या संदर्भात आधी जागृती करण्यात येईल.
– सायबर गुन्हेगारी संदर्भात मनुष्यबळ वाढविण्यात येईल.
अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. सराईत गुन्हेगारावर मोक्का, स्थानबद्धतेची कारवाई यापुढेही सुरू राहील. कायद्याचा वचक गुन्हेगारांवर राहिला पाहिजे. सायबर गुन्हेगारी संदर्भात मनुष्यबळ वाढविण्यात येईल, तसेच खासगी तज्ज्ञांची मदत घेण्यात येईल, असेही अमितेश कुमार यांनी नमूद केले.
पुणेकरांनी भरघोस प्रेम दिले – रितेश कुमार…
माजी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी निरोप समारंभाला उत्तर देताना, पुणे पोलिस आयुक्त म्हणून १३ महिन्यांचा कालावधी कमी होता. पण, पुण्यातील क्राईम रेट कमी करण्यासाठी माझ्यासह संबंध पुणे पोलिस दलाने चांगले परिश्रम घेतले. दहशतवाद्यांचे इसिससारखे मोड्यूल मोडून काढण्यात आमच्या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा होता. यासोबतच विविध सण-उत्सव, कोरेगाव भीमा सारखा संवेदनशील बंदोबस्त कुठलाही अनुचित प्रकार न घडू देता यशस्वी रीतीने पार पडला. मी पोलिस आयुक्त म्हणून १३ महिने होतो; मात्र या शहरात मी नऊ वर्ष विविध जबाबदाऱ्या पार पडल्या. यात पुणेकरांचा वाटा मोठा आहे, त्यांनी मला भरघोस प्रेम दिल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले.

Previous Post

उरणमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान मोहिमेअंतर्गत जनजागृती मोहीम

Next Post

लाखो भाविकांचे रामदर्शन अन् कोट्यवधींचे दान

Next Post
लाखो भाविकांचे रामदर्शन अन् कोट्यवधींचे दान

लाखो भाविकांचे रामदर्शन अन् कोट्यवधींचे दान

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.