Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

एका दिवसात ३,७३७ प्रवाशांनी लोकल पास काढला; लोकलचा पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित नवा विक्रम

मुंबईत उष्णता वाढत असून, मे महिन्यात मुंबईकर घामाघूम झाले आहेत. मुंबईतील रेल्वे प्रवास सुकर होण्यासाठी प्रवासी वातानुकूलित लोकलकडे वळले आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 8, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
एका दिवसात ३,७३७ प्रवाशांनी लोकल पास काढला; लोकलचा पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित नवा विक्रम
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मोठ्याप्रमाणात वाढत असून दिवसेंदिवस प्रवासी संख्येत, उत्पन्नात, तिकीट-पास संख्येत नव्या नोंदी होत आहेत. ६ मे रोजी वातानुकूलित लोकलचा ३,७३७ प्रवाशांनी लोकल पास काढला. पश्चिम रेल्वेच्या आतापर्यंतच्या नोंदीमधील हा नवा विक्रम समाविष्ट झाला असून त्यापूर्वी ५ फेब्रुवारी रोजी ३,७१३ लोकल पास काढले होते. तसेच १५ एप्रिल रोजी ३,६७३ लोकल पास काढले होते. मुंबईत उष्णता वाढत असून, मे महिन्यात मुंबईकर घामाघूम झाले आहेत. मुंबईतील रेल्वे प्रवास सुकर होण्यासाठी प्रवासी वातानुकूलित लोकलकडे वळले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात प्रवाशांची पावले वातानुकूलित लोकलकडे वळत आहेत. १ ते ६ मे दरम्यान वातानुकूलित लोकलची एकूण १,६०,६४५ तिकिटे आणि पास काढण्यात आले. यात १,४७,८३० तिकिटे आणि १२,८१५ पास समाविष्ट आहेत. हे प्रमाण मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी अधिक आहे. प्रवाशांचे वाढते प्रमाण वातानुकूलित लोकलची आवश्यकता दर्शवत आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या पश्चिम रेल्वेवरून आठवड्याच्या दिवशी ९६ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. त्यासाठी ७ वातानुकूलित लोकल रेकचा वापर केला जातो. परंतु उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वातानुकूलित लोकलमध्ये वाढत असल्याने, प्रवाशांच्या सोयी आणि सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने वातानुकूलित लोकलचा एक रेक पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवणे शक्य होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एका दिवसात वातानुकूलित लोकलमधील सर्वाधिक प्रवासी

६ मे २०२४ – २,३९,३५४

४ मार्च २०२४ – २,३९,३५४

१५ एप्रिल २०२४ – २,३९,१८३

एका दिवसात सर्वाधिक वातानुकूलित लोकल पास काढणारे

६ मे २०२४ – ३,७३७

५ फेब्रुवारी २०२४ – ३,७१३

१५ एप्रिल २०२४ – ३,६७३

Previous Post

पुन्हा तीन दिवसांची मुंबईतील भूखंडाच्या ई लिलावासाठी मुदतवाढ

Next Post

एपीएमसीत सामायिक जागेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई

Next Post
एपीएमसीत सामायिक जागेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई

एपीएमसीत सामायिक जागेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.