Lokrakshanay
Sunday, October 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचे ढग गडद! अमेरिकेने इराणचे ५ ऑइल टँकर्स केले उद्ध्वस्त; तणाव शिगेला

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 10, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचे ढग गडद! अमेरिकेने इराणचे ५ ऑइल टँकर्स केले उद्ध्वस्त; तणाव शिगेला
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यात शांततेच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी वेग आला होता. मात्र, आता दोन्ही देशांतील तणावाने धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिकन सैन्याने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) शी संबंधित तेल नेटवर्कवर मोठी कारवाई करत पाच तेल टँकर्स उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. ओमानच्या आखातात आणि खार्ग बेटाजवळ ही लष्करी मोहीम राबविण्यात आली. अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) च्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत इराणने अमेरिकन नौदलाच्या एका युद्धनौकेवर दोन वेळा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकन संरक्षण यंत्रणेने हे दोन्ही हल्ले यशस्वीपणे परतवून लावल्यानंतर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एम/टी काविझ, एम/टी चारमिनार, एम/टी होरायझन १, एम/टी रिएस्को आणि एम/टी देर्या या पाच टँकर्सना लक्ष्य करण्यात आले. कारवाईपूर्वी जहाजांवरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आल्याचे अमेरिकेने सांगितले आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, या तेल टँकर्सद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर तेल व्यापारातून मिळणाऱ्या अब्जावधी डॉलर्सचा वापर IRGC आणि त्यांच्या सहयोगी दहशतवादी संघटनांच्या आर्थिक मदतीसाठी केला जात होता. या कारवाईमुळे इराणकडून अधिक आक्रमक प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आहे.

दरम्यान, इराणच्या सरकारी माध्यमांनी खार्ग आणि जास्क बेटांजवळ हल्ले झाल्याची पुष्टी केली असून जहाजांवरील कर्मचारी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. मात्र, या कारवाईनंतर संतप्त झालेल्या IRGC ने कुवैत आणि बहरीनमधील अमेरिकन सैन्याशी संबंधित तेल जहाजांवर हल्ल्याची धमकी दिली आहे. या वाढत्या संघर्षाचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. जगातील महत्त्वाचा सागरी व्यापार मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. याचवेळी इराण समर्थक मानले जाणारे हूती बंडखोरही अधिक सक्रिय झाले असून त्यांनी सौदी अरेबियातील चार शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा समोर आला आहे. या हल्ल्यांत ७३ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी यापूर्वीच अमेरिकन जहाजांवर हल्ला झाल्यास इराणच्या तेल सुविधांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा दिला होता. त्याला अनुसरून झालेल्या या कारवाईमुळे अमेरिका–इराण संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, पश्चिम आशियात पुन्हा एकदा मोठ्या युद्धाची भीती व्यक्त केली जात असून, त्याचा परिणाम जागतिक तेलपुरवठा, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Previous Post

सूरज चव्हाणच्या घरी ‘राधा’चे आगमन! कृष्ण जन्माष्टमीला कन्यारत्नाचा लाभ; कुटुंबात आनंदोत्सव

Next Post

सध्या प्रकाशित झालेली प्रारूप मतदार यादी ही अंतिम मतदार यादी नाही – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय

Next Post
सध्या प्रकाशित झालेली प्रारूप मतदार यादी ही अंतिम मतदार यादी नाही – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय

सध्या प्रकाशित झालेली प्रारूप मतदार यादी ही अंतिम मतदार यादी नाही – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय

BreakingNews

दुष्काळग्रस्तांसाठी दिलासा; पुणे जिल्ह्यातील १० तालुक्यांतील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

आता OTP पाहण्यासाठी मेसेजेस ॲप उघडावे लागणार?

AI तंत्रज्ञान आणि ५५ दिग्गज कलाकारांचा संगम; पहिल्यांदाच येतोय मराठीतील एआय (AI) चित्रपट ‘बागुलबुवा’!

‘पादचारी प्रथम’ अभियान; दादरमध्ये १२ अतिक्रमणे आणि ६० फेरीवाल्यांवर कारवाई

‘७६ लाख मतांच्या घोटाळ्याप्रकरणी २८ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा’; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात कारवाईची मागणी – प्रकाश आंबेडकर

स्विगीचे नवे फीचर लॉन्च: एकाच वेळी ५ वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करता येणार

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.