पिंपरी- चिंचवड : मुंबईमध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पिंपरी- चिंचवडमधील तक्रारदार अमेय विजय बिर्जे यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या घरातील लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज आरोपी अब्दुल उर्फ चिरा इंद्रिस शेख आणि धर्मेश रामाचार्य दिवाकर यांनी घरफोडी करून चोरून नेला होता. आरोपींना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दिवाळीच्या काळात फिर्यादी अमेय यांच्या घरातील एक लाख २२ हजारांचे सोन्याचे दागिने कुलूप तोडून लंपास केले होते. अब्दुल उर्फ चिरा इंद्रिस शेख आणि धर्मेश राम आचार्य दिवाकर यांनी घरफोडी केली. दोघांनी मुंबई, पालघर आणि ठाणे परिसरात तब्बल २५ घरफोड्या केल्याचं समोर आलं आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून दोघांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात आपल्याला कोणी ओळखणार नाही आणि घरफोडी करून परत मुंबईत जाऊ असा गैरसमज आरोपींना होता अखेर वाकड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.