Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 29, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : आतापर्यंत शाळा, ग्रामपंचायत कार्यालय किंवा इतर सरकारी इमारतींमध्ये मतदान केंद्रे निश्चित केली जात होती. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच गृहनिर्माण सोसायटयांमध्ये मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार पुणे शहर, मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगर येथील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत. शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता यंदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शहरी भागात मतदानाचा टक्का कमी असतो. महानगरांमध्ये ५० टक्क्यांच्या आसपास मतदान होते. या ठिकाणचे मतदान वाढावे, या मतदारांना घराजवळच मतदान केंद्र असल्यास ते मतदान करतील, या आशेने केंद्रीय निवडणूक आयोगाने पुणे, मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगर येथे सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिक मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपक्रम, योजना, स्पर्धा, कल्पना राबविल्या जातात. तसेच मतदानाच्या दिवशी घरापासून दोन किलोमीटर अंतराच्या आत मतदान केंद्र निश्चित करून मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, शहरी मतदारांकडून मतदानाच्या दिवशी निरूत्साह दिसून येतो. सुशिक्षित मतदार मतदानाच्या दिवशी सुटी असल्याने बाहेर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत बोलताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘पुणे, मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांमध्ये मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा मोठ्या सोसायट्यांच्या आवारातच मतदान करण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. साधारणपणे एक हजारापेक्षा जास्त सदस्यसंख्या असणाऱ्या सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. राज्यात अशा प्रकारची १५० मतदान केंद्रे असणार आहेत. त्यामध्ये मुंबईत ६१, पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी ३६, तर मुंबई उपनगरात १७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणच्या सोसायट्यांमधील सदस्यांना जागेवर मतदान करता येणार आहे.

Previous Post

पर्यावरणपूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Next Post

११ लाखांची तरुणाची परदेशात नोकरीच्या बहाण्याने फसवणूक

Next Post
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

११ लाखांची तरुणाची परदेशात नोकरीच्या बहाण्याने फसवणूक

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.