Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पोलिसांच्या वाहनातून पळालेल्या दोन आरोपींना सुरतमध्ये अटक

भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना सुरत येथून अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 9, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
४ वर्ष देशमुख टोळीचा फरार आरोपी अखेर जेरबंद
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना सुरत येथून अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आले. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्ह्या दाखल आहे. दरम्यान, सुरत पोलिसांच्या मदतीमुळे या दोन्ही आरोपींना अटक करणे शक्य झाले. मोईन यामीन कुरेशी (२३) आणि शाहीद अली शहा (१९) अशी या आरोपींची नावे असून दोघेही गोवंडी परिसरातील राहणारे आहेत. महिनाभरापूर्वीं या दोघांवर नवघर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपी ऑर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होते. ५ मार्चला या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका होणार होती. याची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी दोघांना ऑर्थर रोड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना पोलीस वाहनातून मुलुंड येथे आणण्यात येत होते.

पोलिसांची गाडी घाटकोपरच्या छेडा नगर सिग्नलवर येताच दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गाडीतून पळ काढला. याबाबत त्यांच्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रणावरून दोन्ही आरोपी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून एका ट्रेनमधून जात असल्याचे आढळले. नवघर पोलिसांनी ही माहिती सुरत पोलिसांना दिली. पोलिसांनी सुरत रेल्वे स्थानकावरून या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

होळी विशेष मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या रेल्वेगाड्या

Next Post

केंद्र सरकारचे नवीन नियम जारी; पाळलेल्या विदेशी प्राण्यांची नोंदणी आता बंधनकारक

Next Post
केंद्र सरकारचे नवीन नियम जारी; पाळलेल्या विदेशी प्राण्यांची नोंदणी आता बंधनकारक

केंद्र सरकारचे नवीन नियम जारी; पाळलेल्या विदेशी प्राण्यांची नोंदणी आता बंधनकारक

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.