Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

वाहतूक विभागाकडून कल्याण शहरातील २२ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध

कल्याणमध्ये वाहने उभी करण्याचा प्रश्न गंभीर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 17, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
वाहतूक विभागाकडून कल्याण शहरातील २२ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक भागात मागील तीन वर्षापासून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेली उड्डाण पुलाची कामे, रेल्वे स्थानक भागात रस्ते अडवून बसणारे फेरीवाले, बाजारपेठांमध्ये कल्याण शहरा बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने कल्याण शहरात वाहने उभी करण्याची समस्या गंभीर झाली आहे. शहरात वाहन कोंडीचे प्रमाण वाढल्याने वाहतूक विभागाने येथील २२ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास वाहन चालकांना प्रतिबंध केला आहे. तर, १५ रस्त्यांवर वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.  वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी यासंदर्भातची अधिसूचना जाहीर केली. २२ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने याविषयी कोणाला काही हरकत असेल तर त्यांनी वाहतूक विभागाच्या ठाणे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त डॉ. राठोड यांनी केले आहे.

कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानक भागात दिवंगत दिलीप कपोते हे एकमेव वाहनतळ आहे. कल्याण शहर परिसरातून नोकरीसाठी रेल्वेने जाणारा बहुतांशी नोकरदार आपल्या दुचाकी, चारचाकी वाहने रेल्वे स्थानक भागातील वाहनतळ, रस्त्यांवर उभी करून इच्छित स्थळी जातो. ही वाहने तो कपोते वाहनतळात उभी करून ठेवतो. या वाहनतळाची क्षमता दाखल होणाऱ्या वाहनांपेक्षा कमी असल्याने बहुतांशी वाहन चालक आपली चारचाकी, दुचाकी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील गल्लीबोळ, अरूंद रस्ते, इमारती, सरकारी कार्यालयाच्या आडोशाने उभी करून ठेवतात. ही वाहने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. या वाहनांच्या बाजुला फेरीवाले पदपथ, रस्ते अडून बसतात. त्यामुळे इतर वाहनांना या अडथळ्याचा त्रास सहन करावा लागतो. अलीकडे कल्याण पश्चिमेत वाहन कोंडीचे प्रमाण वाढल्याने वाहतूक विभागाने कल्याण पश्चिमेतील अनेक रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाहने सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रतिबंधित रस्त्यावर उभी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

पत्रीपूल ते लालचौकी, जुना आग्रा रस्ता, दुर्गाडी ते गोविंदवाडी वळण रस्ता, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक, नेहरू चौक ते श्री देवी रूग्णालय, सुभाष चौक ते मुरबाड रस्ता शासकीय विश्रामगृह, दीपक हॉटेल ते पुष्पराज हॉटेल, साधना छेद रस्ता ते झुंझारराव बाजार, कराची मेडिकल ते आर्चिस गॅलरी, गुरूदेव हॉटेल ते बस आगार, पाठारे नर्सरी ते आंबेडकर रस्ता, शिवाजी महाराज चौक ते फुले चौक, स्टेट बँक ते मॅक्सी ग्राऊंड, पौर्णिमा चौक ते बिर्ला महाविद्यालय, सहजानंद चौक ते संतोषी माता रस्ता वल्लभ चौक, काझी रुग्णालय ते काळी मस्जिद, दक्षिण मुखी मारूती मंदिर ते मोहिंदरसिंग शाळा, लालचौकी ते पारनाका, खडकपाडा सर्कल ते पोलीस ठाणे, संदीप हॉटेल ते वाणी विद्यालय, प्रेम ऑटे ते शहाड रेल्वे स्थानक, प्रेम ऑटो ते बिर्ला महाविद्यालय, आंबिवली स्थानक ते मोहने बाजार, डी. बी. चौक ते मुख्य चौक. श्रीदेवी रुग्णालय ते वल्लीपीर चौक, शिवाजी चौक ते शंकरराव चौक, शंकरराव चौक ते अत्रे मंदिर, गांधी चौक, शंकरराव चौक ते पारनाका, स्टेट बँक ते प्रेम ऑटो मुरबाड रस्ता, कर्णिक रस्त्यावर अंबर वडापाव ते स्टार स्कॅनिंग, सिंडिकेट ते आयुक्त बंगला, बिर्ला कॉलेज ते आरटीओ, सहजानंद ते अहिल्याबाई चौक, कौतवाल चौक ते खडकपाडा सर्कल, शक्ती चौक ते गोल्डन पार्क, मोहिंदरसिंग ते क्रोमा शोरूम, लालचौकी ते आधारवाडी, साई चौक ते प्रांत ऑफिस, वाणी विद्यालय ते साई चौक.

Previous Post

वेश्याव्यवसाय करणाऱ्या अभिनेत्रीसह पुण्यात २ रशियन मॉडेल ताब्यात; पोलिसांची मोठी कारवाई

Next Post

शिवसेनेतील दिग्गज नेते ज्या माणसामुळे बाहेर गेले, त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला..!

Next Post
शिवसेनेतील दिग्गज नेते ज्या माणसामुळे बाहेर गेले, त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला..!

शिवसेनेतील दिग्गज नेते ज्या माणसामुळे बाहेर गेले, त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला..!

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.