Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डोंबिवलीत चोरट्याने मोटारींच्या काचा फोडून केली दोन लाख ९५ हजार रूपयांचा चोरी….

तीन रहिवाशांच्या मोटारींच्या काचा अज्ञात चोरट्याने संध्याकाळी फोडून मोटारीमधील कारटेप आणि सामान असा मिळून दोन लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 28, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
कल्याणमध्ये बेकायदेशीररीत्या बांधलेल्या इमारतीतील घरं विकून १० जणांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील रुणवाल गार्डन, पलावा या गृहसंकुलातील तीन रहिवाशांच्या मोटारींच्या काचा अज्ञात चोरट्याने संध्याकाळी फोडून मोटारीमधील कारटेप आणि सामान असा मिळून दोन लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे. पलावा, रुणवाल गार्डन येथे भक्कम सुरक्षा कडे आणि सुरक्षा रक्षक तैनात असताना या घटना घडल्याच कशा, असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित करण्यात आला आहे. आर गॅलरी रुणवाल गार्डन, कासारिओ स्मशानभूमीजवळ पलावा येथे या घटना घडल्या आहेत. या घटनेप्रकरणी कासाबेला, पलावा येथील सवाना सोसायटीत राहणारे देवेंद्र बाळकृष्ण शहाणे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले, पलावा वसाहतीत राहणारे देवेंद्र शहाणे यांची वॅगनॉर कार त्यांनी ते राहत असलेल्या सोसायटीच्या तळ मजल्याला वाहनतळावर उभी करून ठेवली होती. त्याच बरोबर त्यांच्या सहकाऱ्यांच्या दोन मोटारी आर गॅलरी येथे वाहनतळावर उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या.

संध्याकाळी साडे तीन नंतर अज्ञात चोरट्याने वाहनतळाच्या जागेत प्रवेश केला. त्याने टोकदार लोखंडी वस्तूने तिन्ही वाहनांच्या काचा फोडल्या. या मोटारींमधील कारटेप आणि इतर सामान असा एकूण दोन लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज घेऊन चोरटा पळून गेला. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. पालवे यांनी या गृहसंकुल परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. मोठ्या गृहसंकुलांमध्येही आता चोरट्यांनी शिरकाव केल्याने रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच, खोणी पलावा येथील ऑर्चिड क्राऊन सोसायटीत राहणाऱ्या सोाली सोमनाथ गिरी यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने सोसायटीच्या वाहनतळावरून चोरून नेली आहे. पलावा वसाहतीमधील या वाढत्या वाहन चोरी, वाहन तोडमोडीच्या घटनांनी रहिवासी हैराण आहेत.

Previous Post

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सात जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

Next Post

भाजपचे कृत्य, अधम आणि नीच प्रकारचं, म्हणून आम्ही जोडे मारो आंदोलन करणार – संजय राऊत

Next Post
भाजपचे कृत्य, अधम आणि नीच प्रकारचं, म्हणून आम्ही जोडे मारो आंदोलन करणार – संजय राऊत

भाजपचे कृत्य, अधम आणि नीच प्रकारचं, म्हणून आम्ही जोडे मारो आंदोलन करणार - संजय राऊत

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.