Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी केला पर्दाफाश

मध्य रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या एका टोळीचा कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चौघांना पोलिसांनी अटक केली आहे धक्कादायक म्हणजे चारही आरोपी तामिळनाडूचे आहेत. त्यांच्याकडून पोलीसांनी महागडे मोबाईल आणि एक लॅपटॉप हस्तगत केला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 6, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी केला पर्दाफाश
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सध्या मुंबईत गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून चोरांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांची गस्त, कठोर तपास, नीट लक्ष ठेवूनही गुन्ह्याच्या अनेक घटना घडत आहेत, त्यामुळे सामान्य नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून जगावा लागत आहे. मध्य रेल्वे ही खरंतर मुंबईकरांची लाईफलाइन, लाखो प्रवाशांची यातून रोज ये-जा असते. पण हा प्रवासही आता फारसा सुरक्षित राहिलेला नाही. वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांची पाकिटं, मोबाईल पळवण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. प्रवाशांना लुटणाऱ्या, त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या अशाच एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये चौघांना अटक करण्यात आली असून एक धक्कादायक माहितीदेखील समोर आली आहे. चोरट्यांची ही टोळी चक्क तामिळनाडू येथील असून फक्त चोरीसाठी ते मुंबईत यायचे आणि नंतर पसार व्हायचे, हे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांकडून 11 महागडे मोबाईल व एक लॅपटॉप जप्त केला आहे.  एका प्रवासाच्या मोबाईल चोरी प्रकरणात काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी सत्यराज ओंथुरगा या चोरट्याला ताब्यात घेतले होते. डोंबिवली जीआरपी पोलीस सत्यराजची चौकशी करून त्याच्याकडून माहिती काढून घेत होते. तर दुसरीकडे कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलीस देखील सत्यराज यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की सत्यराजचे आणखी काही साथीदार प्रवाशांना लुटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर येणार आहेत.

ही माहिती मिळताच रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांचं पथक कामाला लागलं आणि त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वर सापळा रचला. रेल्वे प्रवाशांना लुटण्यासाठी, चोरी करण्यासाठी आलेले कृष्णा गणेश , शक्तीवेल अवालुडन ,गणेश सेल्वम यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. तपासणीत त्यांच्याकडून बरीच माहिती मिळाली आणि प्रवाशांचे लुटलेले 11 महागडे मोबाईल व एक लॅपटॉपही पोलिसांनी हस्तगत केला. त्याच्या तपासातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे चोरट्यांची ही टोळी थेट तामिळनाडू राज्यातील होती. हे चोरटे वेल्लूर जिल्हा येथील उदय राजा पालयन या गावातून फक्त चोरी करायला मुंबईत आले होती . ही टोळी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यातही जायची आणि तेथील प्रवाशांना लक्ष्य करायची. गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटायची. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे. प्रवाशांची चोरीस गेलेले आणखी अनेक महागडे मोबाईल, लॅपटॉप वा इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या जाऊ शकतात. मध्य रेल्वेचे डीसीपी मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक अरशद शेख पोलीस अधिकारी प्रकाश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला.

Previous Post

निर्भय, नि:पक्ष वातावरणात निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

Next Post

वाहतुकीसाठी शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका खुल्या

Next Post
वाहतुकीसाठी शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका खुल्या

वाहतुकीसाठी शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका खुल्या

BreakingNews

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा हिमांशू रॉय लिगसी पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.