Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

‘धर्मवीर 2’ हा चित्रपट प्रदर्शित; हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आहे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 27, 2024
in मनोरंजन
‘धर्मवीर 2’ हा चित्रपट प्रदर्शित; हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आहे
Share on FacebookShare on Whatsapp

‘धर्मवीर 2’ : आज 27 सप्टेंबर रोजी ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची घोषणा जेव्हा करण्यात आली होती. तेव्हापासून प्रेक्षकांमधली उत्सुकता ही शिगेला पोहोचली होती.

दरम्यान, पहिल्या भागात जिथे चित्रपटाच्या क्लायमॅक्समुळे प्रेक्षकांसमोर प्रश्न उपस्थित झाला होता तिथे दुसरीकडे आता काय पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आता एक लक्षवेधी गोष्ट समोर आली आहे की या चित्रपटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटात स्वत: एक भूमिका साकारली आहे.

खरंतर या चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका ही अभिनेता क्षितीश दाते यानं साकारली आहे. पण चित्रपटाच्या शेवटी काही मिनिटांसाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसत आहेत. तर त्यांच्या चित्रपटातील डायलॉग्सवर प्रेक्षकांच्या शिट्या आणि टाळ्या पडल्या आहेत. नेहमी आपण पाहतो की कलाकार हे त्या त्या राजकारण्याची भूमिका साकारताना दिसतात. कधीच राजकारणात सक्रिय असलेली व्यक्ती ही चित्रपटात किंवा मोठ्या पडद्यावर दिसत नाही. पण यावेळी चक्क मुख्यमंत्रीच पडद्यावर आले. त्यामुळे आता या सगळ्याचा येत्या निवडणूकीवर काही परिणाम होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सोशल मीडियावर नेटकरी त्यांना असलेली उत्सुकता ही दाखवत आहेत. आधीच्या ट्विटर अर्थात आताच्या X अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ‘धर्मवीर 2’ पाहण्यासाठी असलेली त्यांची उस्तुकता दाखवली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘जीवनापेक्षा मोठी कथा आणि एक आशादायक सिक्वेल! धर्मवीर 2 आज रिलीज होत आहे, आणि मी जादू पाहण्यासाठी थांबू शकत नाही.’

दरम्यान, ‘धर्मवीर 2’ विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर अवलंबून आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका ही अभिनेता प्रसाद ओकनं साकारली आहे. तर हा चित्रपट झी स्टुडियोज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत आहे.

Previous Post

वंदे भारत ट्रेनबाबत धक्कादायक बातमी; ट्रेनच्या निम्म्या जागाही भरताना मुश्कील

Next Post

रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या टाळण्यासाठी ‘हि’ ५ फळे खा

Next Post
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या टाळण्यासाठी ‘हि’ ५ फळे खा

रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या टाळण्यासाठी ‘हि’ ५ फळे खा

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.