Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वंदे भारत ट्रेनबाबत धक्कादायक बातमी; ट्रेनच्या निम्म्या जागाही भरताना मुश्कील

ट्रेनचे भाडेच एवढे आहे की ती सर्वांना परवडणारी नसल्याने काही मार्ग हे तोट्यात चालले आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 27, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश, राष्ट्रीय
वंदे भारत ट्रेनबाबत धक्कादायक बातमी; ट्रेनच्या निम्म्या जागाही भरताना मुश्कील
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली प्रतिनिधी : वंदे भारत ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. एका मागोमाग एक, एकाचवेळी अनेक मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु केल्या जात आहेत. या ट्रेनचे भाडे व्हीआयपी ट्रेनपेक्षाही जास्त आहे. सुरुवातीला काही रुटवर सुरु करण्यात आलेली वंदे भारत ही प्रिमिअम ट्रेन आता जवळपास ६६ मार्गांवर सुरु करण्यात आली आहे. परंतू, या ट्रेनचे भाडेच एवढे आहे की ती सर्वांना परवडणारी नसल्याने काही मार्ग हे तोट्यात चालले आहेत.

रेल दुनियाच्या वेबसाईटवर वंदे भारतच्या ट्रेनही माहिती आली होती. यानुसार काही मार्गांवर वंदे भारत एकदम फुल होत आहेत. काही मार्गांवर वंदे भारतला प्रवासीच मिळत नाहीत अशी स्थिती आहे. भुवनेश्वर-विशाखापट्टणम, टाटानगर-ब्रह्मपूर, रीवा-भोपाळ, कलबुर्गी-बेंगळुरू, उदयपूर-आग्रा/जयपूर, दुर्ग-विशाखापट्टणम, नागपूर-सिकंदराबाद आदी मार्गांवर तर निम्म्यापेक्षा जास्त सीट रिकाम्याच राहू लागल्या आहेत.

देशातील प्रमुख शहरांना, राज्यांना इंटरसिटीसारखे जोडण्याचे काम वंदे भारतने केले आहे. उद्योगधंदे असलेली शहरे, धार्मिक स्थळे असलेली शहरे आदी भाग या वंदे भारतद्वारे जोडण्यात येत आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, बनारस, पुणे या शहरांतून या वंदेभारत ये-जा करतात. असे असले तरी यामध्ये विमानासारखी प्रिमिअम सेवा आहे. अगदी मुंबई-पुणे असा वंदेभारतने प्रवास करायचा असल्यास ट्रेन येण्यापूर्वीपण तिकिटे उपलब्ध असतात अशी परिस्थिती आहे. या मार्गावरील वंदे भारत ट्रेन लोकांच्या सोईची आहे, तसेच ती बहुतांश वेळा प्रवाशांनी भरलेली असते. परंतू, असे ११ मार्ग आहेत जिथे प्रवासीच मिळत नाहीएत. नागपूर ते सिकंदराबाद ट्रेनमध्ये एकूण १३२८ सीट्स आहेत. त्यापैकी बहुतांश वेळा सरासरी १११८ सीट रिकाम्याच असतात. भुवनेश्वर विशाखापट्टनची ट्रेन १०७६ पैकी ९३४ जागा रिकाम्या ठेवून धावत असते. अशीच परिस्थिती इतर ट्रेनची आहे. या ट्रेनना निम्म्या जागाही भरताना नाकीनऊ येत आहेत.

Previous Post

जागतिक रेबीज दिनानिमित्त अँटी रेबीज लसीकरण शिबीराचे आयोजन

Next Post

‘धर्मवीर 2’ हा चित्रपट प्रदर्शित; हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आहे

Next Post
‘धर्मवीर 2’ हा चित्रपट प्रदर्शित; हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आहे

'धर्मवीर 2' हा चित्रपट प्रदर्शित; हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आहे

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.