Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आदिवासी पाड्यातील नागरिकांची ‘आरोग्य हिस्ट्री’ डिजिटल क्यूआर कोड लॉकेटमुळे सुरक्षित!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 6, 2026
in ताज्या बातम्या, पालघर
आदिवासी पाड्यातील नागरिकांची ‘आरोग्य हिस्ट्री’ डिजिटल क्यूआर कोड लॉकेटमुळे सुरक्षित!
Share on FacebookShare on Whatsapp

पालघर : ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना अनेकदा स्वतःला नेमकी कोणती व्याधी आहे, याची जाणीव नसते. लक्षणे दिसत नसल्याने अनेक आजार अंगावर काढले जातात, जे पुढे जीवघेणे ठरतात. या समस्येवर मात करण्यासाठी केशवसृष्टी आणि पालघर जिल्हा प्रशासनाने ‘डिजिटल क्रांती’चा आधार घेतला आहे. जिल्ह्यात ‘परिवार स्वास्थ्य कार्ड’ आणि ‘क्यूआर कोड’ असलेले विशेष मेटल लॉकेट उपक्रम राबविला जात असून, यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवणे अधिक सुलभ झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील विक्रमगड, जव्हार, वाडा, कासा आणि मोखाडा या पाच तालुक्यांतील दुर्गम भागांत आतापर्यंत १००० हून अधिक नागरिकांना हे विशेष ‘हेल्थ लॉकेट’ देण्यात आले आहे. या लॉकेटमध्ये असलेल्या क्यूआर कोडमध्ये संबंधित व्यक्तीची संपूर्ण मेडिकल हिस्टरी (आरोग्य इतिहास) दडलेली असते. जर एखादा व्यक्ती अचानक बेशुद्ध पडला किंवा अपघात झाला, आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजारांची माहिती नसेल, तर डॉक्टर केवळ तो कोड स्कॅन करून आणि ठराविक पासवर्ड वापरून रुग्णाचे रक्तगट, जुने आजार, ॲनिमिया, रक्तदाब यांसारखी सर्व माहिती मिळवू शकतात. या उपक्रमा दरम्यान डिजिटल मॅपिंग, टेलि-कन्ल्टेशन, स्टार हेल्थ कार्ड (मुलांसाठी), महिला आरोग्य शिक्षण आणि स्वास्थ्य रक्षक दांपत्य हे पाच मुख्य स्तंभ असून यामुळे ४८ पेक्षा जास्त गावे व १००० हून अधिक मुले ‘स्टार हेल्थ कार्ड’ने लाभान्वित झाली आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विक्रमगडमधील एका शेतकऱ्याचा जीव केवळ लॉकेट स्कॅन केल्यामुळे वाचला आहे. तंत्रज्ञान आणि मानवी सेवा यांचा हा संगम पालघरच्या आदिवासी पाड्यांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत आहे.

Previous Post

ठाण्याच्या टीएमटी गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास! डिजिटल बस पाससाठी सॅटीस पुलावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी

Next Post

पेनड्राईव्हवर असणार्‍या ‘त्या’ दोन छिद्रांचे काम काय?

Next Post
पेनड्राईव्हवर असणार्‍या ‘त्या’ दोन छिद्रांचे काम काय?

पेनड्राईव्हवर असणार्‍या ‘त्या’ दोन छिद्रांचे काम काय?

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.