ठाणे : येथून जवळ असलेल्या एका परीसरातील एका हाँटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली आग स्थानिक नागरीकांनी वेळीच विझवली.यामुळे या घटनेत मोठी हानी झाली नाही.मुंब्रा शहरा जवळील दिवा-खर्डी रस्त्याच्या जवळ असलेल्या अल हुदा टाँवर या इमारतीच्या तळमजल्यावर वसीम खान यांचे २०० स्क्वेअर फूट आकाराचे हाँटेल आहे.फरहान कडालकर सध्या ते भाडेतत्वावर चालवत आहेत.या हाँटेलमध्ये सोमवारी मध्यरात्री १ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास आग लागली. याबाबतची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी,शिळ-डायघर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि आणि शीळ अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.जवान घटनास्थळी पोहचण्यापूर्वी स्थानिक नागरीकांनी फायर एक्स्टिंगविषरच्या सहाय्याने आग विझवली होती.या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.