Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

लोकल पकडण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा धोकादायक प्रवास

दररोज सकाळ, संध्याकाळ हा प्रकार गर्दीच्या वेळेत सुरू असतो. अनेक प्रवासी हे लोखंडी रोधक ओलांडताना पडतात.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 15, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
लोकल पकडण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा धोकादायक प्रवास
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवाशांनी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करू नये म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एक ते पाचच्या दरम्यान रेल्वे मार्गालगत चार ते पाच फुटाचे लोखंडी रोधक उभे केले आहेत. तरीही अनेक प्रवासी स्वताच्या जीवाची पर्वा न करता लोकल पकडण्यासाठी रेल्वे मार्गात उड्या मारून लोखंडी रोधक ओलांडून लोकल पकडण्यासाठी धडपड करत आहेत. दररोज सकाळ, संध्याकाळ हा प्रकार गर्दीच्या वेळेत सुरू असतो. अनेक प्रवासी हे लोखंडी रोधक ओलांडताना पडतात. डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा जवान, स्थानक व्यवस्थापक तैनात असतात. तरीही त्यांच्याकडून या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई होत नसल्याने अनेक प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी फलाट क्रमांक पाचवरून मुंबईला जाणारी अतिजलद लोकल पकडण्यासाठी सकाळच्या वेळेत उभे असतात. यावेळी अतिजलद लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा धावण्याची उद्घोषणा झाली तर प्रवासी तात्काळ रेल्वे मार्गात उड्या करून लोखंडी रोधक ओलांडून फलाट क्रमांक तीन वर येणारी धीमी लोकल पकडण्यासाठी धावपळ करतात. फलाट क्रमांंक तीनवरील प्रवासी जलद लोकल ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून दिसत असताना रेल्वे मार्गात उड्या मारून डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर येणारी लोकल पकडण्याची प्रयत्न करतात.

तसेच, अनेक प्रवासी जिने चढायला लागू नये म्हणून रेल्वे मार्ग ओलांडून पूर्व, पश्चिम भागात जातात. रेल्वे मार्गातील लोखंडी रोधक उंच असल्याने अनेक वेळा प्रवाशांना त्या रोधकावरून उड्या मारून पलीकडे जाता येत नाही. म्हणून प्रवाशांनी रोधकावरून उडी मारण्यासाठी लोखंडी रोधकाजवळ मोठे दगड, काँक्रिटच्या गोणी आणून ठेवल्या आहेत. या गोणी, दगडावर पाय ठेवला की लोखंडी रोधकावरून अलगद पलीकडे जाता येते. रेल्वे मार्ग ओलांडताना अनेक वेळा फलाट क्रमांक पाच, चारवरून मेल, एक्सप्रेस, मालगाड्या धावत असतात. ठाकुर्ली ते डोंबिवली, कोपर, दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे प्रवासी मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Previous Post

हॉटेलमध्ये मध्यरात्री आग लागलेली स्थानिक नागरिकांनी विझवली; मुंब्राजवळील खर्डी परिसरातील घटना

Next Post

नव्याने विस्तारित केलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर तुंबले पाणी

Next Post
नव्याने विस्तारित केलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर तुंबले पाणी

नव्याने विस्तारित केलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर तुंबले पाणी

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.