Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 15, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे, विशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने तीन सविस्तर मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केल्या आहेत. राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या रंग-कोडेड सतर्कतांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश उष्णतेमुळे होणारे आजार व मृत्यू कमी करणे हा आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या उपाययोजना अनौपचारिक क्षेत्रातील कामगार, खाण कामगार आणि कमी उत्पन्न गटांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या एसओपीमध्ये लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या १५ उच्च-उष्णता-जोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बाहेर काम करणारे मजूर, रस्त्यावरील विक्रेते, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि डिलिव्हरी कर्मचारी यांच्यासाठी कामाचे वेळापत्रक बदलणे, पाणी व विश्रांतीची सुविधा, सावली व्यवस्था आणि आरोग्य सेवा मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुसऱ्या आणि तिसऱ्या एसओपीमध्ये चंद्रपूरमधील कोळसा खाण कामगारांसाठी उष्णता ताण व्यवस्थापन तसेच उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माणावर भर देण्यात आला आहे. खाण कामगारांसाठी थंड विश्रांती केंद्रे, पुरेसा पाणीपुरवठा, वायुवीजन, कामाचे नियोजन, जॉब रोटेशन आणि उष्णता आजार ओळख प्रशिक्षण यांचा समावेश आहे. तर गृहनिर्माणासाठी कूल रूफ, हरित क्षेत्रे, थर्मल सुधारणा आणि हवामान-संवेदनशील नियोजन यासारख्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. तात्काळ, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या टप्प्यांमध्ये या उपायांची अंमलबजावणी केली जाणार असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महापालिका आणि इतर विभागांच्या समन्वयातून ती राबवली जाईल. वाढत्या तापमानामुळे राज्यातील काही भागांत तापमान ४७ ते ४९ अंशांपर्यंत पोहोचत असल्याने प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांना दुपारी ११ ते ४ या वेळेत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, या एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Previous Post

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

Next Post

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Next Post
जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; 'राजा शिवाजी' चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

BreakingNews

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.