Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘क्रांतिज्योती’च्या पोरांची महाराष्ट्रभर चर्चा; पहिल्याच वीकेंडला ३.९१ कोटींची कमाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 5, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
‘क्रांतिज्योती’च्या पोरांची महाराष्ट्रभर चर्चा; पहिल्याच वीकेंडला ३.९१ कोटींची कमाई
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सोशल मीडियावर व बुक माय शोवर चित्रपट ट्रेंडिंग ठरत आहे. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला तब्बल ३.९१ कोटींचा गल्ला जमवला आहे. जोरदार कमाई करत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

पहिल्याच दिवसापासून अनेक शहरांमध्ये चित्रपट हाऊसफुल जात असून, मराठी शाळेच्या आठवणींमध्ये रमलेले प्रेक्षक भावुक होऊन चित्रपटगृहातून बाहेर पडताना दिसत आहेत. चित्रपटातील आशय, संवाद, भावनिक क्षण आणि वास्तववादी मांडणी यामुळे प्रेक्षकांशी थेट नाळ जुळली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. चित्रपटाच्या प्रभावी कथेची मांडणी, कलाकारांची नैसर्गिक अभिनयशैली, मनाला भिडणारे संगीत आणि प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी मराठी मातीची ओढ यामुळे हा चित्रपट केवळ एक सिनेमा न राहता एक अनुभव ठरत आहे. समीक्षकांकडूनही या चित्रपटाला भरभरून दाद मिळत असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

Previous Post

राज्यातील बँक कर्मचाऱ्यांची ५ दिवस देशव्यापी संपाची घोषणा

Next Post

विरार मधील ‘वेद मास्टर्स प्रीस्कूल’ व ‘श्लोक अकॅडमी’चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

Next Post
विरार मधील ‘वेद मास्टर्स प्रीस्कूल’ व ‘श्लोक अकॅडमी’चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

विरार मधील 'वेद मास्टर्स प्रीस्कूल' व 'श्लोक अकॅडमी'चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.