Lokrakshanay
Tuesday, August 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विरार मधील ‘वेद मास्टर्स प्रीस्कूल’ व ‘श्लोक अकॅडमी’चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 5, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
विरार मधील ‘वेद मास्टर्स प्रीस्कूल’ व ‘श्लोक अकॅडमी’चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न
Share on FacebookShare on Whatsapp

विरार (रघुनाथ कदम) : ‘वेद मास्टर्स प्रीस्कूल’, ‘श्लोक अकॅडमी कोचिंग क्लासेस’ आणि ‘व्ही.एस. डान्स अकॅडमी’ यांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत दिमाखात पार पडला. फूलपाडा परिसरातील सुप्रसिद्ध डॉक्टर गुलाबराव देशमुख हे या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत रंगलेल्या या सोहळ्यात विद्यार्थी आणि पालकांच्या कलागुणांचा अविष्कार पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी बोलताना डॉ. गुलाबराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यातील कलागुणांना वाव देणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक केले.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर पालकांनीही मंचावर दिलेले सादरीकरण. विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य, कथाकथन आणि गायन सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. विशेष म्हणजे, ‘पालक-पाल्य’ जोडीने केलेल्या नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या फॅशन शोसोबतच पालकांसाठी आयोजित केलेल्या ‘फॅमिली फॅशन शो’ला मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात आयोजित ‘सरप्राईज गेम्स’मुळे उपस्थितांमध्ये मोठी उत्सुकता आणि आनंद दिसून आला. याप्रसंगी वर्षभरात आयोजित केलेल्या मासिक स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थी व पालकांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच, वार्षिक क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्यांना सुवर्णपदके आणि करंडक प्रदान करण्यात आले. मंचावर सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. विशेषतः मुख्याध्यापिका वृंदा जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि या कार्यक्रमाच्या तयारीसाठी घेतलेल्या अविरत परिश्रमांबद्दल प्रत्येक पालकाने त्यांचे मनापासून आभार मानले. “वृंदा मॅडम प्रत्येक मुलाकडे ज्या आपुलकीने आणि मेहनतीने लक्ष देतात, त्यामुळेच आमच्या मुलांमध्ये एवढा सकारात्मक बदल दिसत आहे,” अशा शब्दांत पालकांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. “आमची मुले ‘वेद मास्टर्स’मध्ये शिकत असल्याचा आम्हाला अभिमान असून ही विरार पूर्वेतील सर्वोत्तम शाळा आहे,” असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वेद मास्टर्स, श्लोक अकॅडमी आणि व्ही.एस. डान्स अकॅडमीच्या शिक्षक व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

Previous Post

‘क्रांतिज्योती’च्या पोरांची महाराष्ट्रभर चर्चा; पहिल्याच वीकेंडला ३.९१ कोटींची कमाई

Next Post

आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद!

Next Post
आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद!

आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद!

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.