नवी मुंबई : नवी मुंबईतील ३१ डिसेंबर २०१५पूर्वीच्या आणि नंतरच्या बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व विभाग कार्यालयांना त्यांच्या विभागातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती जमवून त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यानुसार नवी मुंबई महापालिका हद्दीत सरासरी चार हजार बांधकामांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यासाठी दररोज शहरातील विविध भागांतील कारवाईचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे.
मागील दहा वर्षांत सुनियोजित अशा नवी मुंबईत गेल्या काही वर्षांत मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे उभी. काही ठिकाणी पालिकेच्या, सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण करून मोठ्या इमारतींची उभारणी. तर, काही ठिकाणी बांधकाम परवानगी न घेताच इमारती उभ्या. गावठाणात बेकायदा बांधकामांची संख्या मोठी. जुन्या घरांवर मोठ्या इमारतींची उभारणी. शहरातील माथाडी वसाहतीमध्येही हीच परिस्थिती. घणसोली, कोपरखैरणे, नेरूळ, सानपाडा येथे उभारलेल्या बैठ्या चाळींचे रूपांतर आता बहुमजली इमारतींमध्ये. शहरात काही ठिकाणी मिळेल त्या जागेवर भूमाफियांकडून इमारतींची उभारणी. त्यामुळे शहराच्या बकालपणात वाढ.