Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बाबा सिद्दीकी यांचा सुरक्षारक्षक कॉन्स्टेबल श्याम सोनावणे याच्यावर निलंबनाची कारवाई

मात्र फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला, असा दावा सोनावणे यांनी केला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 19, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
बाबा सिद्दीकी यांचा सुरक्षारक्षक कॉन्स्टेबल श्याम सोनावणे याच्यावर निलंबनाची कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला आज 8 दिवस उलटले आहेत. 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये सिद्दीकी यांच्यावर तिघांनी गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

सिद्दीकी यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असून सिद्दीकी यांची सलमानशी जवळीक असल्यानेच त्यांना टार्गेट करून संपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.याप्रकरणी पोलिसांनी चौघांन अटक केली असून रोज नवनवे खुलासे होत आहेत.

दरम्यान सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. सिद्दीकी यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाकडून चूक झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळेच कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या शनिवारी रात्री सिद्दीकींच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळी सोनावणे हेच सिद्दीकींसोबत होते. फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला, असा दावा सोनावणे यांनी केला आहे. बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका कॉन्स्टेबलची सुरक्षा देण्यात आली होती.

बाबा सिद्दीकी यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कालच पोलिसांनी जबाब नोंदवला. शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला तेव्हा हा कॉन्स्टेबल कुठे उभा होता? फायरिंग झाल्यावर त्याने काय केलं ? तो घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी त्या सुरक्षारक्षक कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवून घेतला. मात्र आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली. झिशान यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी केली. ” लोकांचं संरक्षण करताना आणि निर्दोष गरीब लोकांची घरं वाचवताना माझ्या वडिलांनी जीव गमावला. आज माझे पूर्ण कुटुंब कोलमडलं आहे. पण माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण व्हायला नको. त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको. मला न्याय हवाय, माझ्या कुटुंबाला न्याय हवाय”, असं ट्विट झिशान सिद्दीकी यांनी केलं होतं.

Previous Post

“सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटलेत, त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी”- प्रवीण दरेकर

Next Post

आता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांच्या खटल्यांचे होणार थेट प्रक्षेपण

Next Post
आता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांच्या खटल्यांचे होणार थेट प्रक्षेपण

आता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांच्या खटल्यांचे होणार थेट प्रक्षेपण

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.