मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज दिले आहे. ‘आमचं जरांगे यांना खुला आव्हान आहे की त्यांनी निवडणूक लढवावी. सुपारी घेतल्यासारखा बोलू नये,’ असे दरेकर म्हणाले आहेत.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण दरेकर म्हणाले, “सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटल्यासारखे वाटत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचं हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल, असं आम्हाला वाटलं होतं. परंतु मराठ्यांचं आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता, ते देवेंद्र फडणवीसांच्या नावाने आक्रोश करत आहेत, हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखं त्यांचं पहिल्यापासून आजपर्यंत सुरू आहे. ते म्हणाले की, “जरांगे पाटील हे कुणाचा एन्काऊंटर करतायेत. भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी महाविकास आघाडीचे एन्काऊंटर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आमचं जरांगे यांना खुला आव्हान आहे की त्यांनी निवडणूक लढवावी. सुपारी घेतल्यासारखा बोलू नये. जरांगे केवळ फडणवीस यांच्यात द्वेषातून कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखं बोलत आहेत. लोकांच्याही आता ते लक्षात आले आहे. आपण भाजपाचे उमेदवार बघून टार्गेट करण्याचे नियोजन, ही खेळी समजण्या इतका महाराष्ट्र दूधखुळा राहिलेला नाही.”
“जर खरंच तुमच्यामध्ये धमक असेल, तर तुम्ही स्वतः निवडणूक लढवा. उमेदवार उभे करा. सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावं किंवा आमदार निवडून आणून सरकारला विधिमंडळात विषय मार्गी लावण्यासाठी भाग पाडावं”, असे आव्हान प्रवीण दरेकर यांनी दिले.
“आपला कुणीतरी वापर करतंय. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी पोळी भाजतेय. त्याला तुम्ही बळी पडत आहात. हे मराठा समाजाचा घात करत आहात, हे तरुणांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांना हे आवडतंय नाहीये. आजही सांगतो तुम्हाला राजकारणापलिकडे जाऊन डोक्यावर घेऊ, तुम्ही राजकीय कपडे घातलले आहेत, ते बाजूला काढा”, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
“ज्या दिवशी तुम्ही पाडापाडीची भूमिका घ्याल. शरद पवारांना, महाविकास आघाडीला मदत करणारी भूमिका असेल, त्या दिवशी मराठा समाजाचा, विशेषतः तरुणांचा भ्रमनिरास झालेला असेल. आजही मराठा समाज आपलं ऐकेल, बोलले. तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचं बोला, त्यांच्या फायद्याचं बोला. तुमची आताची भाषा आहे, ती कोणाची आहे?”, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना केला.”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.