Lokrakshanay
Monday, April 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 27, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महापालिका रुग्णालयांमध्ये रेबीज लस उपलब्ध नसल्याचे आरोप सातत्याने होत असताना, कांदिवली शताब्दी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाने प्रत्यक्ष कामगिरीतून वेगळाच आदर्श घालून दिला आहे. २०२५ वर्षभरात तब्बल २३ हजार ७३६ रुग्णांना रेबीज लसीकरण देत या रुग्णालयाने उपनगरातील आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कामगिरीमुळे कांदिवली शताब्दी रुग्णालय उपनगरातील रेबीज उपचारासाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून पुढे येत आहे. विशेष म्हणजे रेबीज इंजेक्शन देण्यात पालिका प्रमुख रुग्णालयात शताब्दी रुग्णालय अव्वल स्थानी असून केईएम रुग्णालय दुसऱ्या स्थानी तर इतर रुग्णालये त्याही खाली असल्याची माहिती मिळत आहे. रेबीज प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या इम्युनोग्लोब्युलिनच्या ३ हजार ८८४ व्हायल्सचा वापर करत २ हजार १७१ रुग्णांना उपचार देण्यात आले. याशिवाय ‘रॅबिप्युअर’ लसीच्या ७ हजार ७३२ व्हायल्सचा वापर करण्यात आला. तर २०२६ मध्येही ही सेवा सुरू असून आतापर्यंत ६ हजार १११ रुग्णांना लसीकरण देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, इतर काही पालिका रुग्णालयांमध्ये रेबीज लस उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना कांदिवली शताब्दी रुग्णालयात पाठवले जाते. त्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असते. काही वेळा इतर रुग्णालयाकडून रुग्णांना थेट कांदिवली शताब्दी रुग्णालयात रेबीज लसीकरणासाठी पाठवले जाते. ‘येथे इंजेक्शन निश्चित मिळेल’ या विश्वासाने रुग्णांची संख्या वाढत असली तरी यामुळे रुग्णालय प्रशासनावर ताण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, काही रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध असूनही रुग्णांना येथे पाठवण्यात आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. रेबीजसारख्या जीवघेण्या आजारासाठी वेळेवर उपचार अत्यावश्यक असतात. इम्युनोग्लोब्युलिन हे धोक्याच्या पातळीवर असलेल्या रुग्णाला दिले जाते. रुग्णालयात तुटवडा असल्यास रुग्णाला दाखल करून घेत है इंजेक्शन मागवून रुग्णाला उपलब्ध करून दिले जाते. मात्र उपचाराअभावी रुग्णाला घरी पाठवत नाही. ही केवळ आकडेवारी नसून नागरिकांचा आमच्यावर असलेला विश्वास आहे, अशी माहिती – डॉ. अजय गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक, शताब्दी रुग्णालय, यांनी दिली आहे.

Previous Post

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Next Post

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

Next Post
पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

BreakingNews

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

महाराष्ट्र दिनाचे गिफ्ट! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.