Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मालमत्ता खरेदी-विक्रीतील फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील कोणत्याही दस्त नोंदणीसाठी आधार ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले असून १ ऑक्टोबर २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत नोंदणी व मुद्रांक विभाग कार्यरत असून, याच विभागामार्फत स्थावर मालमत्तांच्या दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. अनेकदा खोटे साक्षीदार, बनावट पक्षकार किंवा चुकीच्या ओळखीच्या आधारे मालमत्ता व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी नोंदणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी करून ती अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार अनिवार्य केल्यामुळे दस्त नोंदणी करणाऱ्या व्यक्तींची ओळख निश्चित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बनावट व्यक्तींच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार कमी होतील आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल. सरकारच्या या निर्णयामुळे मालमत्ता व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा आहे. ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड उपलब्ध नसेल, त्यांनी आधार नोंदणी केल्याची पावती आणि त्यासोबत इतर सरकारी ओळखपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित व्यवहारातील व्यक्तींचे नाते सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रेही अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच मालमत्ता व्यवहाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. १८ वर्षांखालील मुलांच्या बाबतीत त्यांच्या आई-वडिलांची किंवा कायदेशीर पालकांची संमती आवश्यक राहणार आहे. त्यांच्या माध्यमातूनच आधार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मात्र, केवळ आधार क्रमांक उपलब्ध नाही म्हणून कोणत्याही बालकाला किंवा पात्र लाभार्थ्याला दस्त नोंदणीच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Previous Post

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

Next Post

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

Next Post
पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

BreakingNews

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.