Lokrakshanay
Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईहून इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे निघालेल्या फ्लायदुबईच्या प्रवासी विमानामुळे मोठी खळबळ उडाली. हे विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत असताना प्रथम ‘स्क्वॉक कोड 7700’ प्रसारित करण्यात आला, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर आणीबाणीची स्थिती दर्शवतो. त्यानंतर काही वेळातच विमानातून ‘स्क्वॉक कोड 7500’ पाठवण्यात आला. हा कोड सामान्यतः विमान अपहरण किंवा बेकायदेशीर हस्तक्षेपाचा संकेत मानला जात असल्याने सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या. या अलर्टनंतर इस्रायलने लढाऊ विमानांना सज्ज केले, तर विमानाचे सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुरुवातीला ही घटना विमान अपहरणाची असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

मात्र, नंतर समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना विमान अपहरणाची नसून कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये झालेल्या गंभीर वाद किंवा हाणामारीशी संबंधित असू शकते, अशी माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे विमानाने आपत्कालीन सिग्नल प्रसारित केला होता. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. फ्लायदुबईनेही विमानात काही प्रकारची घटना घडल्याची पुष्टी केली असून संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे काही काळ पश्चिम आशियातील हवाई सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली होती.

Previous Post

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

Next Post

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.