Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 27, 2026
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, पुणे
पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. त्यात जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण २३ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. सुमारे ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोंदेवाडी फाटा परिसरातून हर्षल दत्तात्रय तांदळे (वय २५, रा. मंचर, ता. आंबेगाव) आणि महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय २५, रा. मंचर, ता. आंबेगाव) यांना अटक केली. तसेच मावळ तालुक्यातील कामशेत परिसरातून पियुष बिरम नानावत (रा. सांगेशी, ता. मावळ) याला ताब्यात घेण्यात आले. याशिवाय एका विधीसंघर्षित बालकाला देखील ताब्यात घेतले आहे.

पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांची माहिती आणि गुप्त खबऱ्यांच्या मदतीने तपास करून ही कारवाई यशस्वी केली आहे. संबंधित आरोपींवर यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.तपासादरम्यान आरोपींनी पारगाव कारखाना, घोडेगाव, नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा तसेच उरुळी कांचन, दौंड, लोणावळा, वडगाव मावळ, राजगड, बारामती, भोर, खेड, शिरूर, सासवड, वेल्हा, यवत या भागांमध्ये चोरी, घरफोडी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या कारवाईत सुमारे ३२ तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकली आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पथकाच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी झाली आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षीरसागर, यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या पथकात शंकरराव पाटील, सचिन वांगडे, सुभाष चव्हाण, सचिन कांडगे यांचा सहभाग होता. या कारवाईत महादेव शेलार, राहुल गावडे, दत्ताजी मोहिते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाऊसाहेब लोकरे, अभिजित सावंत यांनीही तपासात सक्रिय सहभाग घेतला. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण भागातील वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

Next Post

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

Next Post
भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.