Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

रयतच्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देणार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन !

रयत संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील याच्या १३७ व्या जयंती समारंभात पवार बोलत होते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 23, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
रयतच्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देणार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन !
Share on FacebookShare on Whatsapp

सातारा प्रतिनिधी : सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठय़ा प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केले त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा रयतच्या शाळांना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.

रयत संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील याच्या १३७ व्या जयंती समारंभात पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, एक काळ असा होता शैक्षणिक क्षेत्रापासून बहुजन समाज दूर होता. त्यावेळी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचे काम अण्णांनी केले. ज्यांना शिक्षण घेणे शक्य नाही अशा कुटुंबातील मुला-मुलींना तुम्ही कष्ट करा, कमवा आणि घाम गाळून शिका, शैक्षणिकदृष्टय़ा संपन्न व्हा, अशी योजना कर्मवीरांनी सुरू केली. या विचाराला पाठिंबा देणाऱया कार्यकर्त्यांची एक फळी तयार करायचे कामदेखील अण्णांनी केले. रामभाऊ नलावडे, तात्याराव तडसरकर, आप्पासाहेब पाटील अशा अनेक सहकाऱयांनी अण्णांची विचारधारा पुढे नेली.

अण्णांनी उत्तम नेते तयार केले. संस्था उभारण्यासाठी, संस्था चालवण्यासाठी आणि संस्थेतील कमतरता दूर करण्यासाठी समाजासाठी समाजातून मदत गोळा करण्याचे काम करणारी टीम अण्णांच्या विचाराने तयार केली. हा विचार घेऊन काम करणाऱया रयत सेवक व रयत प्रेमी यांच्यामुळे देशात अग्रगण्य संस्था म्हणून रयतचा नावलौकिक आहे. संस्थेचा विस्तार होऊन त्यात लाखो मुले-मुली शिक्षण घेत आहेत. या सगळ्यांच्या पाठीमागे कर्मवीरांचे विचार हा फार महत्त्वाचा ठेवा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच संस्थेस 25 लाखांपेक्षा जास्त देणगी देणारे शकुंतला ठाकूर, रामशेठ ठाकूर, परेश ठाकूर, शुभांगी व महेंद्र घरत, नेताजी पवार, अनिल जवळेकर, यमुना सामाजिक संस्था, मैत्री मुव्हीज, राष्ट्रवादी वेल्फेअर फंड, अशोक बोरा इत्यादींचे सत्कार करण्यात आले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे निवेदन संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले.

कर्मवीर जयंतीनिमित्त साताऱयातील रयतच्या शाखेतील रयत सेवक व विद्यार्थी एकत्र येत कर्मवीरांच्या चित्ररथासह सातारा शहरात प्रभात फेरी काढण्यात आली तसेच समाजसुधारकांच्या पुतळ्यांना पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

Previous Post

तिरुपतीच्या लाडूत चरबी आणि माशांच्या तेलासह अनेक दूषित घटक आढळले; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड.

Next Post

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Next Post
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.