Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 18, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि ‘शिवचरित्र’कार गजानन भास्कर मेहेंदळे (वय ७८) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते अविवाहित होते. भारत इतिहास संशोधक मंडळ येथे गुरुवारी (१८ सप्टेंबर) सकाळी अकरा वाजता मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर एक वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ग.ह.खरे यांची परंपरा वर्धिष्णू करणाऱ्या मेहेंदळे यांनी गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ इतिहास संशोधन कार्याला वाहून घेतले होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. ते क्रियाशील संशोधक होते. फारसी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन विविध भाषांसह मोडी लिपीवर त्यांचे प्रभुत्व होते.

मेहेंदळे सध्या इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधनपर लेखन करत होते. १९७१ च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमांवर युद्ध पत्रकार म्हणून स्वतः हजर होते, आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता. ते मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यांचा अनेक भाषांसह इतिहासातील लिप्यांचा अभ्यास होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच विविध संस्थांशी निकटचा संबंध होता. सध्या त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकाचे काम सुरू होते, ज्याची सुमारे पाच हजार पाने लिहून प्रकाशित होण्यासाठी तयार झालेली आहेत. शिवचरित्र हा विषय १९६९ मध्ये त्यांनी अभ्यासाला घेतला तेव्हापासून अखेरचा श्वास घेईपर्यंत अखंडपणे त्यांचा हा ज्ञानयज्ञ सुरू होता. त्यातून आजवर त्यांनी दोन मराठी व एक इंग्रजी भाषेतील संशोधनपर ग्रंथ सिद्ध केले. त्यांनी मराठीत लिहिलेले शिवचरित्र दोन खंडांत प्रकाशित झाले आहे. ‘शिवछत्रपतींचे आरमार’ हा आणखी एक मराठी ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. त्यांनी इंग्रजी भाषेतूनही एक शिवचरित्र लिहिले आहे. त्यात शिवपूर्वकाळापासून ते शिवरायांच्या मृत्यूपर्यंत पूर्ण इतिहास आला आहे.

गजानन मेहेंदळे यांची ग्रंथसंपदा

  • शिवचरित्र (खंड १) आणि (खंड २)
  • शिवाजी झाला नसता तर
  • टिपू ॲज ही रिअली वॉज,
  • शिवाजी लाईफ अँड टाईम
  • मराठ्यांचे आरमार

 

Previous Post

साप चावल्याचा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवरून व्यावसायिकाने मारली समुद्रात उडी; तब्बल सहा तासांनी आढाळला मृतदेह

Next Post

“आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच..”, अंबरनाथ रेल्वे रूळांशेजारी भिंत उभारण्यास स्थानिकांचा विरोध

Next Post
“आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच..”, अंबरनाथ रेल्वे रूळांशेजारी भिंत उभारण्यास स्थानिकांचा विरोध

“आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच..”, अंबरनाथ रेल्वे रूळांशेजारी भिंत उभारण्यास स्थानिकांचा विरोध

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.